नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपोवन क्रॉसिंग भागातील आईस फॅक्टरी परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने ४६ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सचिन अशोकराव कोतवाल (रा.सम्राट वृदावन सोसा.आडगावनाका) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. कोतवाल गुरूवारी (दि.५) पहाटे चार वाजेच्या सुमारास तपोवन भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. तपोनव क्रॉसिंग येथील आईस फॅक्टरी परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने कोतवाल गंभीर जखमी झाले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास दुखापत झाल्याने ग्रॅव्हीटी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून त्यांना सह्याद्री रूग्णालयात हलविण्यात आले होते.
दुस-या दिवशी उपचार सुरू असतांना डॉ. प्रितम अहिरराव यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ. फराह सय्यद यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.