देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकी व वाळूचा ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. देवळा-मालेगाव रोडवरील खुंटेवाडी फाट्याचा बस स्टॉपसमोर हा अपघात झाला. या अपघातात राकेश अनिल ठाकरे (१८) हा जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर खर्डे येथील भूषण धना माळी हा जखमी झाला आहे. या घटनेनंतर देवळा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर चालक वैभव दिनकर आहेर याला अटक करण्यात आली आहे. या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, वाखारी येथील ट्रॅक्टर क्रमांक एम एच १५ डी. यू. ५३०९ हा ट्रॅक्टर ट्रॉली मधून वाळू घेऊन खुंटेवाडी गावाकडून जात होता .त्याचवेळी पिंपळगावकडून देवळा दिशेने येत असलेली दुचाकी एम. एच. ०१ क्यू. ७२६६ ने ट्रॅक्टरला धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेचा पुढील तपास देवळा स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे करीत आहेत.