नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई- नाशिक महामार्गावर राजुर पाटी गांधी पंपाजवळ झालेल्या ट्रक व कंटनेरमध्ये झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात कंटेनर क्रं MH 06.BD.136 व ट्रक क्रं MP.09.HH.9266 यांच्यात झाला. मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकने उभ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातानंतर ट्रक चालक संजय नायक यास बाहेर काढण्यासाठी दीड तासांनी यश आले. तो गंभीर जखमी आहे तर विकास नायक हा किरकोळ जखमी झाला आहे. रात्री १.३० वाजता हा अपघात झाला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने येथे मदत कार्य सुरु झाले. त्यांना तात्काळ वाडिव-हे खासगी हॉस्पिटलमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले.