नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड येथे शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीजवळ भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रीकांत विजय साबळे असे मृताचे नाव आहे. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान, स्कॉर्पिओ चालक हा घटनास्थळावरून फरार झाला असून नाशिक रोड पोलीस त्याचा शोध घेत आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातात स्कॉर्पिओने दुचाकी स्वारला समोरून धडक दिली. यात दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.









