येवला( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील सायगाव फाट्या जवळ सकाळच्या सुमारास स्विफ्ट कार व मालवाहू पिकअप यांच्या समोरा समोर झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. स्विफ्टकार मधील सर्व जण हे औरंगाबाद येथून येवल्याकडे येत होते. दरम्यान या अपघाताची माहिती समजताच तातडीने सर्वांना खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने येवला येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.