नाशिक : नाशिक पुणे मार्गावरील शिंदे पळसे परिसरात भरधाव अज्ञात बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात झाला. सदाशिव दगडू काकड (४५ रा.शिंदेगाव ता.जि.नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. काकड दुध विक्रीचा व्यवसाय करायचे गुरूवारी (दि.२०) दुपारी नेहमीप्रमाणे ते दूध वाटप करण्यासाठी घराबाहेर पडले होते. तत्पूर्वी ते दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी परिसरातील सुभाष पेट्रोल पंप येथे गेले असता हा अपघात झाला. पेट्रोल भरून ते शिंदे गावाच्या दिशेने जात असतांना भरधाव एस.टीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ सिन्नर फाटा येथील साईकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.धिरज नरवाडे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.