पेठ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – पेठ – धरमपुर महामार्गावरील राजबारी फाट्या जवळ कार -ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील इंद्रजीत रायचंद्र जोगरे, वय ३३ (रा . शिलदा ता . कापराडा जि. बलसाड) व कमलेश बाळू जाधव, वय २८ (रा. चेपा ता. कापराडा, जि. बलसाड) या दोघांचा मृत्यू झाला. तर ड्रायव्हर मगनभाई रामदास वाघेरा हे जखमी झाले आहे. या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिककडून धरमपूरकडे रात्री १० वाजे दरम्यान जाणारी महेद्रा कंपनीची कार क्र . जीजे १५ -सीएम ९५९५ ही भरधाव वेगाने जात असतांना ड्रायव्हर मगनभाई रामदास वाघेरा यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर समोरुन येणा-या मालवाहू ट्रकला ही कार धडकली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची तक्रार नरेंद्रभाई जोगरा यांनी दिली असून या तक्रारीवरुन पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार डंबाळे अधिक तपास करीत आहेत.