नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – आयशरने कंटनेरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना मुंबई – आग्रा महामार्गावरील इगतपुरी नांदगाव फाट्यावर झाली. पहाटे झालेल्या या अपघातात आयशर चालक संजीव कुमार (२२) रा. उत्तरप्रदेश हा जागीच ठार झाला आहे. या अपघातात क्लीनर जखमी झाला असून त्याच्यावर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार चालु आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघांनाही दोन तासाच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले. त्यातील गंभीर जखमीला टोलनाका रुग्णवाहिकेने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसात या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कालच एक अपघात झाला होता. त्यात एक जण ठार झाला. त्यानंतर दुस-या दिवशी हा अपघात झाला. या रस्त्यावर पडलेले खड्डे व महामार्गाची झालेली दुर्दशा हे सुध्दा अपघाताला कारणीभूत ठरत आहे.