नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुबंई – आग्रा महामार्गावर गोंदे फाटा येथे विल्होळी आठवा मैलाजवळ आयशर व थार कारच्या अपघातात एक जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. रात्री ठीक ४.३० वाजता हा अपघात झाला. मुंबईकडून नाशिककडे येणा-या थार कारने आठवा मैल विल्होळी जवळ आयशर कारला मागून जोरदार धडक दिली. त्यात थार कार चालक जागीच ठार झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहीती मिळताच गोंदे फाटा येथे अपघातग्रस्ताच्या सेवेत आसलेली जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ऑबुलन्सने तात्काळ नाशिक जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
या अपघातात कार चालक विश्वजीत सोगरा (३०), रा. इंदुर हा ठार झाला. तर आकाश ढोलपुरे, अहम्मद बन्सारी, अमित,अक्षय कानडे, शक्ती ठाकुर हे जखमी झाले आहे.