नाशिक : सिबीएस चौकात सिटीलिंक बसने धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बसचालकाविरूध्द सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुने सिबीएस भागातून गेल्या रविवारी (दि.७) रात्री ५५ वर्षीय फिरस्ता अनोळखी पुरूष पायी जात असतांना त्यास भरधाव एमएच १५ जीव्ही ७९६८ या महापालिकेच्या सीटी लिंक बसने जोरदार धडक दिली होती. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हवालदार पी.एम.धारणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बस चालक गोविंद थोरात यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.