नाशिक – भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे जखमी झाल्याची घटना पंचवटी डेंटल कॉलेजसमोर, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी भाऊसाहेब कुंवर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भूषण रामचंद्र ओतुरकर (वय ३५, रा.कामटवाडा, नवीन नाशिक) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनीमांडळ (जि. नंदूरबार) येथे मुलगा झाल्याच्या नवस फेडण्यासाठी भाऊसाहेब कुंवर कारने पंचवटीतून जात होते. कारमध्ये कुंवर यांची पत्नी, शालक व त्यांची पत्नी, मुलगा होता. मुंबई-आग्रा महामार्गावर व्दारका परिसरात उड्डाण पुलावर कार पंक्चर झाली. कारचालक भूषण ओतुरकर हे कारचे चाक बदलत होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने कारला धडक दिली. या अपघातात तिघे जखमी झाले. अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला. पुढील तपास पोलीस नाईक चौधरी करत आहेत.