नाशिक – भरधाव खासगी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मखमलाबाद रोडवरील क्रांतीनगर जवळ हा अपघात आज दुपारी झाला. दिलीप वळवी असे या अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तीन महिन्यांपूर्वीच मयत वळवी हे पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते. अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.