नाशिक : औद्योगीक वसाहतीतील हॉटेल अजंठा समोर भरधाव अज्ञात टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. शिवराम सिताराम यादव (३० रा.घरकुल योजना,चुंचाळे शिवार) असे मृत दुचाकीस्वारचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव गेल्या २८ मे रोजी एमएच १५ ईसी ३७६१ या दुचाकीवर औद्योगीक वसाहतीतून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला होता. अजंठा हॉटेल समोरून ते प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव येणा-या ब्राऊन रंगाच्या टेम्पोने दुचाकीस धडक दिली होती. या अपघातात यादव गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मित्र संजय सुर्यवंशी (रा.चुंचाळे शिवार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी अज्ञात टेम्पो चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.