नाशिक – के.के.वाघ महाविद्यालय जवळ एस.टी.ने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. मयुर बाळू भोसले (२५ रा.गंगोत्री विहार सोसा.बिडी कामगारनगर अमृतधाम) असे बसच्या धडकेत ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बसचालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. भोसले रविवारी सायंकाळच्या सुमारास प्लेझर दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. व्दारका बाजूकडून येवून तो के.के.वाघ महाविद्यालया नजीकच्या उड्डाणपुलाखालील पोल.न.६४ जवळ रस्ता ओलांडत असतांना ही घटना घडली. यू टर्न घेत असतांना ओझरकडून भरधाव येणा-या पालघर डेपोच्या बसने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात भोसले जागीच ठार झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ प्रफुल्ल भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात बसचालक युवराज गोराणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.