आयुर्वेदीक हॉस्पीटल समोर अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु
नाशिक – गणेशवाडी येथील आयुर्वेदीक हॉस्पीटल समोर अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. विजयप्रसाद राजकिशोर शर्मा (वय ४७, प्लॅट ८,गोकूळ सोसायटी, हिरावाडी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी राजप्रसाद शर्मा यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास विजयप्रसाद हे त्यांच्या ॲक्टीव्हावरुन हिरावाडीत त्यांच्या घरी जात असतांना गणेशवाडी येथील आयुर्वेदीक हॉस्पीटल समोर अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीलाच धडक दिल्याने त्यात विजयप्रसाद गंभीर जखमी झाले. त्यांच्या पत्नी सुधा शर्मा यांनी उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरु असतांना शनिवारी रात्रीपावणे अकराच्या सुमारास डॉ. तडवी यांनी मृत घोषीत केले.
गळफास घेऊन घरात आत्महत्या
नाशिक – गळफास घेऊन घरात आत्महत्या केल्याची घटना पार्थडी परिसरातील म्हाडा कॉलनीत घडली आहे. नामदेव विठोबा शिरसाठ (वय ३७, शहीद भगतसिंग कॉलनी, म्हाडा कॉलनी) असे गळफास घेउन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कैलास भास्कर गुळवे (वय ४०) यांच्या तक्रारी वरुन इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. शनिवारी साडे पाचच्या सुमारास नामदेव शिरसाठ याने त्यांच्या राहत्या घरातील पंख्याच्या लोखंडी हुकला लाल फेट्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.