नाशिक – एकाच दिवशी शहरात झालेल्या तीन अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी हे तिन्ही अपघात शहरातील वेगळ्या भागात झाले. पहिला अपघात कॅालेज रोड भागात झाला. तारा शांताराम कुलकर्णी (वय ६४, मॉडेल कॉलनी) या शनिवारी सायंकाळी साडे पाचला कॉलेज रोडहून जातांना बर्गर किंग दुकानासमोर रस्ता ओलांडत असतांना भोसला सर्कल कडून कॅनडा कॉर्नर कडे जाणाऱ्या काळ्या रंगाच्या बुलेटने त्याना जोरदार धडक दिली. त्यात, ताराबाई गंभीर जखमी झाल्या उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
दुसरा अपघात हा दिंडोरी रोडवर म्हसरुळ गावात झाला. या अपघातात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार युवकाचा मृत्यु झाला. अक्षय नंदू बस्ते (वय २०, शिदवंड ता.दिंडोरी) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. दिंडोरी रोडवर शनिवारी पावणे दोनच्या दुपारी सुमारास मृत हा आपल्या दुचाकी (एमएच १५ इके ३८१७) हिच्यावरुन म्हसरुळ गावातून जातना अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात मृताच्या डोक्यातील हेल्मेट तूटन बाजूला पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. त्यात त्याचा मृत्यु झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. याप्रकरणी लक्ष्ण श्रीराम शिंदे (वय ३६, कोरोटे दिंडोरी) यांच्या तक्ररावरुन म्हसरुळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तिसरा अपघात हा तपोवनमध्ये झाला. चार चाकीच्या धडकेत मॉर्नींग वॉक करतांना एकाचा मृत्यु झाला तर एक जण जखमी आहे. नितीन बबलदास पटेल (वय ५३) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विपीन अंबालाल पटेल (वय ५३, मैत्री बंगला काठे गल्ली) असे जखमीचे नाव आहे. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पटेल तपोवनातील लक्ष्मी नारायण पूल ओलंडून मारुती व्हेपर्स दुकानासमोरुन मॉनींग वॉक करीत परत जात असतांना चारचाकी (एमएच १५ एचजी २०६) जोरदार धडक दिल्याने त्यात, नितीन पटेल व बिपीन पटेल गभीर जखमी झाले. या जखमींना आपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात नितीन पटेल यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले.