बंगळुरू (कर्नाटक) – भारतात लाच देणे किंवा घेणे हा काही नवा प्रकार नाही. सरकारी काम असो की खासगी अनेकदा सर्रास लाच दिली जाते आणि ती मागितलीही जाते. अगदी दहा रुपयांपासून तर कोटी रुपयांपर्यंत लाचेचा व्यवहार बिनदिक्कतपणे चालतो. अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) कार्यरत असले तरी त्याचे कुठलेही सोयरसूतक लाच देणाऱ्या किंवा घेणाऱ्याला नसते. मात्र, जेव्हा एसीबीकडे तक्रार जाते आणि रंगेहाथ लाचेचा व्यवहार पकडला जातो. तेव्हा सारे पितळ उघडे पडते. असाच एक प्रकार सध्या घडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागात कलबुर्गी येथे कार्यरत असलेल्या एका ज्युनिअर इंजिनीअरच्या घरी एसीबीने धाड टाकली. हा इंजिनीअर लाच मागत असल्याची तक्रार होती. एसीबीने सापळा रचला. त्यात इंजिनीअर दोषी आढळून आला. त्यामुळेच त्याच्या बंगल्याची झडती घेण्यासाठी एसीबीचे पथक आले. त्यांनी बंगल्याचा कानाकोपरा पिंजून काढला. अखेर त्यांना कळून चुकले की या बहाद्दरने नोटांचे बंडल भलत्याच ठिकाणी लपवले आहेत. आणि झालेही तसेच. चक्क बंगल्याच्या भिंतींलगत असलेल्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये हे घबाड लपविल्याचे दिसून आले. पथकाने पाईपचे तोंड उघडताच नोटांचे बंडल खाली पडत होते. बघा हा व्हिडिओ
#WATCH Karnataka ACB recovers approximately Rs 13 lakhs during a raid at the residence of a PWD junior engineer in Kalaburagi
(Video source unverified) pic.twitter.com/wlYZNG6rRO
— ANI (@ANI) November 24, 2021