नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव लावून देण्याच्या मोबदल्यात निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील तलाठी आसिफ अनिस पठाण हे दोन हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी जळगाव तालुका निफाड येथे व्यापारी गाळा विकत घेतला असून त्याचा फेरफार करून सदर फेरफारची नोंद मंडळ अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घेऊन सातबारा उताऱ्यावर तक्रारदार त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव लावून देण्याच्या मोबदल्यात यातील पठाण यांनी ३ हजार रुपये लाचेची पंचा समक्ष मागणी करून तडजोडी अंती २ हजार रुपये आज २८ ऑक्टोंबर रोजी स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध निफाड पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
- यशस्वी सापळा कारवाई**
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष
आलोसे- आसिफ अनिस पठाण वय 52 वर्ष पद तलाठी, सजा- पिंपळस (रामाचे) अतिरिक्त कार्यभार तलाठी सजा- जळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक
*लाचेची मागणी- 3000/- तडजोडी अंती लाचेची मागणी 2000/-
*लाच स्विकारली- 2000/-
*हस्तगत रक्कम- 2000/- - लाचेची मागणी – दि.25/10/2024
*लाच स्विकारली – दि.28/10/2024
तक्रार:- यातील तक्रारदार यांनी मौजे जळगाव तालुका निफाड येथे व्यापारी गाळा विकत घेतला असून त्याचा फेरफार करून सदर फेरफार ची नोंद मंडळ अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घेऊन सातबारा उताऱ्यावर तक्रारदार यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव लावून देण्याच्या मोबदल्यात यातील लोकसेवक पठाण यांनी 3000 /रुपये लाचेची पंचा समक्ष मागणी करून तडजोडी अंती 2000/- रुपये लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम 2000/- रुपये आज दिनांक 28/10/2024 रोजी स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध निफाड पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी-मा. माननीय जिल्हाधिकारी नाशिक
▶️ *सापळा अधिकारी –
श्रीमती मीरा वसंतराव आदमाने, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं.9921252549
▶️ *सापळा पथक*
पो. हवा.पंकज पळशीकर
पो.हवा.प्रमोद चव्हाणके
चालक पो.हवा. संतोष गांगुर्डे