नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलिस स्टेशनमधील दोन पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. पोलिस शिपाई किसन रमेश कापसे (वय ३२, रा. वडनेर भैरव पोलीस स्टेशन वसाहत) आणि संतोष दिनकर वाघ (वय ३९, रा. वडनेर भैरव पोलीस स्टेशन वसाहत) अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघांनी ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती ४० हजार रुपये घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेली माहिती अशी
▶️ युनिट – नाशिक
▶️ तक्रारदार- पुरुष,वय-42
▶️ 1.श्री. किसन रमेश कापसे, वय 32वर्षे, व्यवसाय नोकरी- पोलीस शिपाई, वडनेर भैरव पोलीस स्टेशन, ता. चांदवड, जि. नाशिक.
2. संतोष दिनकर वाघ बक्कल नंबर 20 25 वय 39 वर्षे नेम – वडनेर भैरव पोलीस ठाणे , रा. पोलीस स्टेशन वसाहत.
▶️ लाचेची मागणी- 80,000/- रू.
▶️ लाच स्विकारली- 40,000/-रू.
▶️ हस्तगत रक्कम- 40,000/-रू.
▶️ लाचेची मागणी – दि.10/06/2022
▶️ लाच स्विकारली- दि.10/06/2022
▶️ लाचेचे कारण -.
तक्रारदार यांना वडनेर भैरव पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिरवाडे फाटा येथे कल्याण बाजार मटक्याचा व्यवसाय सुरू करायचा असल्याने व्यवसाय सुरळीत चालणे करिता बीट कर्मचारी पो.शी.कापसे यांनी तक्रारदार यांच्या कडे दरमहा 80000/- रू. ची मागणी केली असून 40,000/- रू लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ सापळा अधिकारी- श्रीमती गायत्री जाधव पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
▶️ सापळा पथक – पो हवा प्रफुल्ल माळी, पो ना प्रकाश महाजन, अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
▶️ मार्गदर्शक- 1) मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ आरोपीचे सक्षम अधिकारी- मा.पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
@ टोल फ्रि क्रं. 1064