नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जमीनीचा मोजणी अहवाल उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय यांचेकडे सादर करण्याकरीता ३ हजार रुपयाची लाच घेतांना कळवण येथील भूमी अभिलेख कार्यालयातली लिपिक विजय गवळी हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यांचे विरुद्ध कळवण पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी विक्री केलेल्या वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीचा वाद सह दिवानि न्यायाधीश ’क’ स्तर, कळवण यांचे न्यायालयात २०२२ सालापासून चालू होता. सदर न्यायालयाने यातील वादी व प्रतिवादी यांचे गट क्रमांक १६८ ची मोजणी करून अहवाल सादर करणे बाबत तालुका अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय कळवण जिल्हा नाशिक यांना २५ नोव्हेंबर २०२४ रोजी आदेशित केलेले होते. सदर गट विषयाची मोजणी २१ मे २०२५ रोजी लिपिक गवळी यांनी केली असून त्याबाबतचा मोजणी अहवाल त्यांचे उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय यांचेकडे सादर करणे करता त्यांनी तक्रारदार यांचेकडे ८ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर पहिला हप्ता ३ हजार रुपये आपल्या भूमी अभिलेख कार्यालयात स्वीकारताना गवळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. नाशिक
आरोपी–
1) विजय हनुमंत गवळी, वय–43 ,
पद- नगर भूमापन लिपिक अतिरिक्त कार्यभार निमतानदार, उपाधीक्षक,भूमी अभिलेख कार्यालय, कळवण, ता. कळवण, जिल्हा नाशिक.
रा. नम्रता रो हाऊस, नंबर 4, वरद नगर, बोरगड, म्हसरूळ, नाशिक शहर.
*लाचेची मागणी- दिनांक 30/07/2025 रोजी 8,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 31/07/2025 रोजी 3,000/- रु.
लाचेचे कारण – तक्रारदार यांनी विक्री केलेल्या वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीचा वाद सह दिवानि न्यायाधीश ’क’ स्तर, कळवण यांचे न्यायालयात 2022 सालापासून चालू होता. सदर न्यायालयाने यातील वादी व प्रतिवादी यांचे गट क्रमांक 168 ची मोजणी करून अहवाल सादर करणे बाबत तालुका अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय कळवण जिल्हा नाशिक यांना दिनांक 25/ 11 /2024 रोजी आदेशित केलेले होते. सदर गट विषयाची मोजणी दिनांक 21 मे 2025 रोजी आलोसे यांनी केली असून त्याबाबतचा मोजणी अहवाल त्यांचे उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय यांचेकडे सादर करणे करता आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 8000/– रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार आलोसे यांचे विरुद्ध तक्रारदार यांनी दि.30/07/2025 रोजी केली होती.
या लाचेच्या मागणीची पडताळणी दि.30/07/2025 रोजी पंचासमक्ष केली असता सदर मोजणी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यापूर्वी 3000/– रुपये लाच म्हणून द्यावे लागतील आणि अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर उर्वरित रक्कमेच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे आलोसे यांनी केली.
सदर लाचेची रक्कम पैकी 3000 रु. आपल्या भूमी अभिलेख कार्यालयात स्वीकारताना आलोसे यांना आज 31/07/2025 रोजी रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यांचे विरुद्ध कळवण पो.स्टे. येथे भ्र.प्र.अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सापळा व तपासी अधिकारी श्री संतोष पैलकर, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. विभाग, नाशिक
सापळा पथक-पो.हवा.दिनेश खैरनार, पो.हवा.प्रफुल्ल माळी, पो.ना.अविनाश पवार सर्व नेमणूक ला.प्र.वि.नाशिक युनिट .