नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– चाळीसगाव येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या सात बा-यावर उताऱ्यावरील इतर हक्कातील जुनी कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी २५ हजाराची लाच घेतांना तलाठीसह रोजगार सेवक व एक जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत तलाठी मोमीन दिलशाह अब्दुल यांच्या कार्यालयाबोहर रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार हे तक्रारदार यांच्याकडून २५ हजाराची लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणात तलाठी मोमीन दिलशाह अब्दुल, रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार व दादा बाबु जाधव यांच्याविरुध्द चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडील व इतर सात यांचे मौजे पाथरजे तालुका चाळीसगाव येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या सात उताऱ्यावरील ईतर हक्कातील जुनी कालबाह्य नोंद कमी होणेकरिता त्यांच्या वडिलांनी केलेला अर्ज घेऊन तलाठी यांच्या कार्यालयात गेले. येथे त्यांनी रोजगार सेवक यांना भेटण्यास सांगून त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे दिल्यावर तुमचे काम करून देतो असे सांगितले.
तर खासगी व्यक्ती दादा बाबू जाधव यांनी तक्रारदार यांना लाच देण्यासाठी अपप्रेरणा देऊन प्रोत्साहित केले. या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष, 35 वर्ष.
आरोपी–
1) मोमीन दिलशाद अब्दुल रहीम,वय-29 ,
पद- तलाठी, तहसील कार्यालय चाळीसगाव, जिल्हा जळगाव.
रा.प्लॉट नंबर 9, हरी ओम नगर, राणी पार्क हॉटेल चे मागे, रावासाहेब वाघ यांचे घरात.चाळीसगाव,जिल्हा जळगाव.
2) वडिलाल रोहिदास पवार, वय 40, पद- रोजगार सेवक
रा. मु.पो. लोंजे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव
3) दादा बाबू जाधव, वय -40 व्यवसाय शेती, रा. मु.पो. लोंजे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव
*लाचेची मागणी– दिनांक 03.07.2025 दि.14.07.2025 व दि.17.07.2025 रोजी 25,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 30.07.2025 रोजी 25,000/- रु.
*लाचेचे कारण – तक्रारदार यांचे वडील व इतर सात यांचे मौजे पाथरजे तालुका चाळीसगाव येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील ईतर हक्कातील जुनी कालबाह्य नोंद कमी होणेकरिता त्यांच्या वडिलांनी केलेला अर्ज घेऊन आलोसे क्र 01 यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली असता त्यांनी आलोसे क्र 02 यांना भेटण्यास सांगून त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे दिल्यावर तुमचे काम करून देते अशी तक्रार दि 03.07.2025 रोजी दिली होती.
सदर तक्रारीची दि. 03.07.2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे क्र 01 यांनी तक्रारदार यांना त्यांचे कामाबाबत आलोसे क्र 02 यांस भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आलोसे क्र 02 यांचे सह आलोसे क्र 01 यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी आलोसे क्र 01 यांनी जसा वाटणीपत्राप्रमाणे खर्च येईल असे सांगितले.
त्यानंतर दि.14.07.2025 रोजी तक्रारदार यांनी आलोसे क्र 02 यांचेसह पुन्हा आलोसे क्र 01 यांची भेट घेतली असता आलोसे क्र 01 यांनी त्यांना तक्रारदार यांच्या कामाबाबत उद्या सांगते व आलोसे क्र.02यांचेशी बोलते असे सांगितले. त्यानंतर दि. 17.07.2025 रोजी तक्रारदार यांनी आलोसे क्र 02 यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना आलोसे क्र.01 यांनी तक्रारदार त्यांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात 25,000/- रुपये घेणेबाबत सांगितले. त्यावेळी आलोसे क्र 02 यांच्यासोबत असलेले आरोपी क्र.03 यांनी तक्रारदार यांना लाच देण्यासाठी अपप्रेरणा देऊन प्रोत्साहित केले.
त्यानंतर आज दि.30.07.2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र 02 यांनी आलोसे क्र 01 यांचे चाळीसगाव येथील कार्यालयाबाहेर तक्रारदार यांच्याकडून 25,000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात येऊन आलोसे क्र. 01 ते 03 यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पोस्टे येथे भ्र.प्र.अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सापळा अधिकारी – श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.धुळे
मो. न. 9403747157, 9834202955
सापळा पथक–पो.नि.पद्मावती कलाल,पो.हवा. राजन कदम,मुकेश अहिरे,संतोष पावरा, पो.कॉ.रामदास बारेला,मकरंद पाटील चालक पो. कॉ. जगदीश बडगुजर सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट .