इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून जेसीबी घेण्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या परतफेडतील व्याजाच्या रकमेच्या परतावा मिळणे करिता प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यासाठी जिल्हा समन्वय शुभम भिका देव हे पाच हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याविरुद्ध धुळे शहर पोस्टे येथे भ्र.प्र.अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्याकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रोजगार कामी जेसीबी साठी कर्ज मिळणे करिता पात्रता प्रमाणपत्र घेऊन इंडसइंड बँकेकडून २४ लाख ९६ हजार रुपये वैयक्तिक कर्ज घेऊन जेसीबी खरेदी केले होते.
तक्रारदार यांनी जेसीबी घेण्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या परतफेडतील व्याजाच्या रकमेच्या परतावा मिळणे करिता प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यासाठी जिल्हा समन्वय शुभम भिका देव यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची १६ जुलै रोजी पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना देव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध धुळे शहर पोस्टे येथे भ्र.प्र.अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष, 32 वर्ष.
*आरोपी – 1) शुभम भिका देव,वय-28 ,पद- जिल्हा समन्वय,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित,धुळे.
रा.प्लॉट नंबर 11अ,आदर्श नगर वडेल रोड,देवपूर,धुळे.
*लाचेची मागणी- दिनांक 16.07.2025 रोजी 5,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 16.07.2025 रोजी 5,000/- रु.
*लाचेचे कारण – तक्रारदार यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्याकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रोजगार कामी जेसीबी साठी कर्ज मिळणे करिता पात्रता प्रमाणपत्र घेऊन इंडसइंड बँकेकडून 24 लाख 96 हजार रुपये वैयक्तिक कर्ज घेऊन जेसीबी खरेदी केले होते.
तक्रारदार यांनी जेसीबी घेण्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या परतफेडतील व्याजाच्या रकमेच्या परतावा मिळणे करिता प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली होती सदर तक्रारीची आज दिनांक 16 /07 2025 रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यांचे विरुद्ध धुळे शहर पोस्टे येथे भ्र.प्र.अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सापळा परिवेक्षण अधिकारी –
श्री. सचिन साळुंखे,
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.धुळे
मो. न. 9403747157, 9834202955
सापळा व तपासी अधिकारी -श्रीमती.पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक,
ला. प्र. विभाग, धुळे
*मो. नं . 8788986178
सापळा पथक–
*पो.हवा. राजन कदम, मुकेश अहिरे पो. कॉ. प्रशांत बागुल, पो. कॉ. मकरंद पाटील, चालक पो. कॉ. जगदीश बडगुजर *सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट*