इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सुनेची प्रसूती रजा मंजूर करून देण्यात करिता प्रति महिना ६ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे ३६ हजार रुपये लाचेची मागणी करुन ती स्विकारतांना जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ.मनीषा पितांबर महाजन व कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील हे एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची सून ही जनता शिक्षण मंडळ खिरोदा ता.रावेर या संस्थेच्या धनाजी नाना विद्यालय या शाळेत कायमस्वरूपी उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे तक्रारदार यांच्या सुनेने प्रसूती रजा मिळणे करिता वैद्यकीय प्रमाणपत्रासह २ जून रोजी मुख्याध्यापिका यांच्याकडे अर्ज दिला होता. तक्रारदार यांच्या सुनेच्या सांगण्यावरून तक्रारदार यांनी शाळेत जाऊन आलोसे मुख्याध्यापिका यांची भेट घेऊन त्यांच्या सुनेच्या प्रसूती रजेच्या अर्जाबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना ५ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्यांच्या रजा मंजुरीसाठी तक्रारदार यांच्याकडे एकूण ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी ७ जुलै रोजी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची ७ जुलै रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता आलोसे मुख्याध्यापिका यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या सुनेची प्रसूती रजा मंजूर करून देण्यात करिता प्रति महिना ६ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे ३६ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर ७ जुलै रोजी सापळा कारवाई दरम्यान मुख्याध्यापिका यांनी तक्रारदार यांचे कडून ३६ हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारून कनिष्ठ लिपीक यांना मोजण्यास देऊन ती मोजत असताना आलोसे मुख्याध्यापिका व कनिष्ठ लिपीक यांना रंगेहात पकडण्यात येऊन त्यांचे विरुद्ध सावदा पो. स्टे. येथे भ.प्र.अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे
तक्रारदार- पुरुष, 61 वर्ष.
आरोपी–
1) सौ.मनीषा पितांबर महाजन, वय- 57 वर्ष, व्यवसाय- मुख्याध्यापिका, जनता शिक्षण मंडळाचे धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, ता. रावेर, जि.जळगाव
रा. पंचायतराज ट्रेनिंग सेंटर समोरील चिनावल रोड, खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव.
2) आशिष यशवंत पाटील, वय-27 वर्ष, कनिष्ठ लिपिक, जनता शिक्षण मंडळाचे धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, ता. रावेर, जि .जळगाव.
*लाचेची मागणी- दिनांक 07.07.2025 रोजी 36,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 07.07.2025 रोजी 36,000/- रु.
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांची सून ही जनता शिक्षण मंडळ खिरोदा ता.रावेर या संस्थेच्या धनाजी नाना विद्यालय या शाळेत कायमस्वरूपी उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे तक्रारदार यांच्या सुनेने प्रसूती रजा मिळणे करिता वैद्यकीय प्रमाणपत्रासह दि. 02.06.2025 रोजी आलोसे क्र. 01 यांच्याकडे अर्ज दिला होता. तक्रारदार यांच्या सुनेच्या सांगण्यावरून तक्रारदार यांनी शाळेत जाऊन आलोसे क्र. 01 यांची भेट घेऊन त्यांच्या सुनेच्या प्रसूती रजेच्या अर्जाबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना 5,000/- रुपये प्रमाणे सहा महिन्यांच्या रजा मंजुरीसाठी तक्रारदार यांच्याकडे एकूण 30,000/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि.07.07.2025 रोजी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि. 07.07.2025 रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता आलोसे क्र. 01 यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या सुनेची प्रसूती रजा मंजूर करून देण्यात करिता प्रति महिना 6,000/- रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे 36,000/- रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर दि. 07.07.2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र.01 यांनी तक्रारदार यांचे कडून 36,000/- रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारून आलोसे क्र. 02 यांना मोजण्यास देऊन आलोसे क्र.02 हे लाचेची रक्कम मोजत असताना आलोसे 01 व 02 यांना रंगेहात पकडण्यात येऊन त्यांचे विरुद्ध सावदा पो. स्टे. येथे भ.प्र.अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
*हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*आलोसे यांचे सक्षम अधिकारी*- शिक्षण संचालक, (माध्यमिक), पुणे
सापळा व तपासी अधिकारी –
श्री. सचिन साळुंखे,
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.धुळे
मो. न. 9403747157, 9834202955
सापळा पथक–
*पो. नि . रूपाली खांडवी, पो.हवा. राजन कदम, पो. हवा. मुकेश अहिरे, पो. हवा. पावरा, पो. कॉ. रामदास बारेला, चा. पो. हवा. मोरे, चा. पो. कॉ. बडगुजर सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट.