नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात अडकले. जळगाव जिल्हयातील पारोळा वनपरिक्षेत्र कार्यालयात यांची नेमणूक होती. वनपाल दिलीप भाईदास पाटील व वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची शेतमालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात. तक्रारदार यांनी पारोळा तालुक्यातील इंधवे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सागाचे झाडे तोडण्याचा शेतकरी व तक्रारदार यांच्यात साठ हजार रुपयांचा सौदा झालेला होता. त्यानुसार सदर शेतकरी यांनी उपवन विभाग पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले होते. त्यानुसार सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजार रुपयाची मागणी वनपालांनी केली होती.
*युनिट – *जळगाव*
तक्रारदार- पुरुष, वय ४४,रा. पारोळा जिल्हा जळगाव.
आलोसे- 1) दिलीप भाईदास पाटील वय 52, व्यवसाय वनपाल, मोडाळा, ता. पारोळा रा. देवपूर धुळे.
2) वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड वय 38, व्यवसाय वनपाल, चोरवड , ता. पारोळा, रा.पारोळा जि. जळगांव. दोन्ही नेमणूक वनपरिक्षेत्र कार्यालय पारोळा. ( दोन्ही आरोपी वर्ग ३ आहेत )
*लाचेची मागणी- 8000/-
*लाच स्वीकारली- 8000/-
लाचेचे कारण*. यातील तक्रारदार हे शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची शेतमालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात. तक्रारदार यांनी पारोळा तालुक्यातील इंधवे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सागाचे झाडे तोडण्याचा शेतकरी व तक्रारदार यांच्यात साठ हजार रुपयांचा सौदा झालेला होता त्यानुसार सदर शेतकरी यांनी उपवन विभाग पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी तक्रारदार यांनाका अधिकार पत्र दिले होते. त्यानुसार सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आलोसे क्रमांक एक यांनी तक्रार यांच्याकडे आठ हजार रुपयाची लाजेची मागणी केली करीत असल्याबाबत दि.19/06/2025 रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या प्रमाणे दिनांक 19/06/ 25 रोजी पडताळणी केली असता आलोसे क्रमांक 1 याने 8000 ची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून आज दिनांक 02/07/ 2025 रोजी सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार यांच्याकडून आलोसे क्रमांक १ यांचे सांगणे वरून आलोसे क्रमांक.2 यांनी पंचा समक्ष 8000/-रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- आलोसे क्र.1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आले असून पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्र अधि . 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
*सापळा व तपास अधिकारी – पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.9702433131
सापळा पथक
1) सफौ सुरेश पाटील
2)मपोहेकॉ शैला धनगर
3) पोहेकॉ किशोर महाजन
4) पोकॉ राकेश दुसाने
5) पोकॉ अमोल सूर्यवंशी