नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गावातील ६० रेशनकार्ड काढून देण्यासाठी २६ हजाराची लाच मागणा-या पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी ललित पाटील यांच्यासह एकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. खाजगी इसम सोमनाथ टोचे यांचे समक्ष प्रत्येक रेशनकार्ड ला ५०० रुपये प्रमाणे दर ठरवून त्यापूर्वी ४००० स्विकारले असून उर्वरित २६ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी नाशिक यांचेकडे तक्रार दिलेली होती.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तक्रारदार यांचेकडे खाजगी इसम सोमनाथ व आलोसे ललित पाटील यांनी २६ हजार रुपयाची मागणी पंचांसमक्ष केलेली आहे. ३ जानेवारी २०२५ ला हा प्रकार घडला. त्यानंतर हा गुन्हा चौकशीनंतर दाखल करण्यात आला.
लाचेची सापळा कारवाई*
- युनिट – नाशिक
- तक्रारदार -* पुरूष वय- 60 वर्ष
3आरोपी लोकसेवक – 1) श्री ललित सुभाष पाटील , पुरवठा निरीक्षण अधिकारी (वर्ग 02),पुरवठा विभाग ,इगतपुरी ,जिल्हा नाशिक
2 )खाजगी इसम सोमनाथ रामकिसन टोचे वय 35 वर्ष राहणार भरवीर , तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक.
4.तक्रारीचे स्वरूप:- तक्रारदार हे त्यांचे गावातील 60 रेशनकार्ड काढून देण्याच्या संदर्भात पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री ललित पाटील व गोसावी यांना भेटले होते त्यांनी खाजगी इसम सोमनाथ टोचे यांचे समक्ष प्रत्येक रेशनकार्ड ला 500 रुपये प्रमाणे दर ठरवून त्यापूर्वी 4000 स्विकारले असून उर्वरित 26000 रुपये लाचेची मागणी केली त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी नाशिक यांचेकडे तक्रार दिलेली आहे.
- *तक्रारीची पडताळणी – दिनांक 03/01/25 रोजी तक्रारदार यांचेकडे खाजगी इसम सोमनाथ व आलोसे ललित पाटील यांनी 26000 रुपयाची मागणी पंचांसमक्ष केलेली आहे.
6.सापळा कारवाई –
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील खाजगी इसम सोमनाथ टोचे यांनी इगतपुरी पुरवठा विभागातील ललीत पाटील, पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचेसमक्ष तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी ४,०००/- रुपये यापुर्वी श्री. ललीत पाटील यांना पोहच झाल्याचे सांगितले व राहिलेले २६,०००/- रुपये लाचेची दिनांक ०३/०१/२०२५ रोजी पंचसाक्षीदारासमक्ष मागणी करुन सदर रक्कमेपैकी १०,०००/- रुपये दिनांक ०३/०१/२०२५ रोजी सोमनाथ टोचे याने स्विकारले आहेत. त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ), १२ प्रमाणे गुन्हा केला आहे.
7.आरोपीच्या अंगझडती मध्ये मोबाईल मिळून आले आहेत.
11.आरोपीचे सक्षम अधिकारी :-
मा.सचिव , अन्न व नागरी पुरवठा विभाग , मंत्रालय,मुंबई
- सापळा अधिकारी :-
राजेंद्र सानप
पोलीस निरीक्षक
लाप्रवि .नाशिक
मो.नं. 8208971207 - तपास अधिकारी –
नितीन पाटील
पोलीस निरीक्षक
ला प्र विभाग नाशिक
मो.न. 9284661658
13.* सापळा कार्यवाही पथक :- पो. ह.माळी, पो.ह.विनोद चौधरी पोना विलास निकम , पो शि अनिल गांगोडे चालक पो ह. संतोष गांगुर्डे , पो. ह.विनोद पवार, पो. ह. परशुराम जाधव.