नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बागलाण तालुक्यातील ततानी येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक जितेंद्र खंडेराव सोनवणे हे ८ हजार रुपयाची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले. दळणाचे बँक खात्यावर जमा केल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून त्यांनी ही रक्कम मागितली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचला त्यात ८ हजार रुपये लाच रक्कम मुख्याध्यापक सोनवणे यांनी त्यांचे कार्यालयात तक्रारदार यांचेकडून स्विकारली. त्यानंतर लाचेची रक्कम मोजत असताना काहीतरी संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम टेबलावर ठेऊन तक्रारदार हे कार्यालयाचे बाहेर येऊन इशारा करण्यासाठी येत असताना ते कार्यालयाचे बाहेर दुसऱ्या गेटणे पळून गेले. या प्रकरणी मुख्याध्यापका विरुद्ध सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सविस्तर माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, यातील तक्रारदार हे रोजंदारी शिक्षक असून त्यांचा घरघंटी (छोटी पिठाची गिरणी )असून तक्रारदार यांना धान्य दळून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले असून तक्रारदार यांचे दळणाचे बिल ८७ हजार ४८० रुपये मुख्याध्यपक यांनी बँक खात्यावर जमा केल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून ८ हजार रुपये व मार्च २०२५,एप्रिल २०२५ या महिन्याचे दळणाचे बिल मंजूर करून देण्यासाठी १३०० रुपये अशी एकूण ९ हजार ३०० रुपये लाचेची मागणी करून ८ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली पंच नंबर एक यांचे उपस्थितीत केली. सदरची ८ हजार रुपये लाच रक्कम मुख्याध्यापक सोनवणे यांनी त्यांचे कार्यालयात तक्रारदार यांचेकडून स्विकारली व लाचेची रक्कम मोजत असताना काहीतरी संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम टेबलवर ठेऊन तक्रारदार हे कार्यालयाचे बाहेर येऊन इशारा करण्यासाठी येत असताना मुख्याध्यापक हे कार्यालयाचे बाहेर दुसऱ्या गेटणे पळून गेले. सदर बाबत वर नमुद आरोपी यांचे विरुद्ध सटाणा पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- यशस्वी सापळा कारवाई
युनिट –नाशिक
तक्रारदार- पुरुष,वय-33वर्षे
*आरोपीचे नावे 1) जितेंद्र खंडेराव सोनवणे, वय- 45 वर्ष, धंदा-नोकरी, मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा ततानी ता बागलाण जि नाशिक
*लाचेची मागणी- 8000/-व 1300 रुपये.असे एकूण 9300
*लाच स्विकारली – 8000/- रुपये.
*हस्तगत रक्कम- 8000/- रुपये.
*लाचेची मागणी- दि.23/04/2025
*लाच स्वीकारली – दि.23/04/2025
हकीगत: यातील तक्रारदार हे रोजंदारी शिक्षक असून त्यांचा घरघंटी (छोटी पिठाची गिरणी )असून तक्रारदार यांना धान्य दळून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले असून तक्रारदार यांचे दळणाचे बिल 87480 रुपये आलोसे यांनी बँक खात्यावर जमा केल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून 8000 रुपये व मार्च 2025,एप्रिल 2025 या महिन्याचे दळणाचे बिल मंजूर करून देण्यासाठी 1300रुपये अशी एकूण 9300 रुपये लाचेची मागणी करून 8000रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली पंच न 1 यांचे उपस्थितीत केली. सदरची 8000रुपये लाच रक्कम आलोसे यांनी त्यांचे कार्यालयात तक्रारदार यांचेकडून स्विकारली व लाचेची रक्कम मोजत असताना काहीतरी संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम टेबलवर ठेऊन तक्रारदार हे कार्यालयाचे बाहेर येऊन इशारा करण्यासाठी येत असताना आलोसे हे कार्यालयाचे बाहेर दुसऱ्या गेटणे पळून गेले आहेत. सदर बाबत वर नमुद आरोपी यांचे विरुद्ध सटाणा पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*सापळा व तपास अधिकारी – श्रीमती स्वाती पवार, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक- पो हवा शरद हॆबाडे, पोना युवराज खांडवी, चा पो हवा संतोष गांगुर्डे