नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ५० हजाराच्या लाच प्रकरणात संगमनेर येथील तलाठी अक्षय ढोबळे व खासगी व्यक्ती रमजान नजीर शेख हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. या दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगांवपोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडी वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करू नका व सुरळीत राहू द्या यासाठी लाच मागण्यात आली होती.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा ट्रक द्वारे खडी वाहतूक करण्याचा व्यवसाय असून खडी वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी आणी ट्रक वर कारवाई न करण्यासाठी आरोपी रमजान नजीर शेख वय २८ वर्षे व्यवसाय शेती राहणार मांडवे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी आरोपी लोकसेवक अक्षय ढोबळे तलाठी सजा मांडवे तालुका संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर यांच्या वतीने पंच साक्षीदार समक्ष दिनांक १६ एप्रिल रोजी तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक अक्षय ढोकळे तलाठी सजा मांडवे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना आरोपी रमजान शेख यांच्या भेटून यांच्या समक्ष मी पन्नास हजार रुपये देतो, पण माझे खडी वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करू नका व सुरळीत राहू द्या असे सांगितले. आरोपी तलाठी अक्षय ढोबळे यांनी मी पैसे घेतो पण गाड्या फक्त दोन महिने चालतील असे म्हणून लाच स्विकारण्यास संमती दिली. आरोपी लोकसेवक व खाजगी इसम यांनी मागणी केलेली ५० हजार रुपये लाच रक्कम आरोपी रमजान नजीर शेख यांनी १६ एप्रिल रोजी मारुती मंदिर समोर मांडवे, तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्विकारली . तसेच आरोपी लोकसेवक अक्षय ढोकळे तलाठी सजा मांडवे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना लाचेची रक्कम स्विकारण्याबाबत दूरध्वनीवरून कळवून काय करू असे विचारले असता त्यांनी ठीक आहे. उद्या बघू असे म्हणून लाच स्विकृतीस संमती दिलेली आहे. सापळा कारवाईत आरोपी खाजगी इसम यास ताब्यात घेण्यात आले आलेले आहे. यातील आलोसे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगांवपोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई**
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरूष वय- 35
*1)आरोपी (खाजगी इसम) रमजान नजीर शेख वय-28 रा. मांडवे ता. संगमनेर जिल्हा अहिल्या नगर
2) अक्षय बाबाजी ढोकळे तलाठी,सजा मांडवे ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर(अटक नाही) वर्ग-3
*लाचेची मागणी-* 50,000/- रु.
तडजोडीअंती स्विकारलेली लाचेची रक्कम-50000/- रुपये/ स्वीकारले आहेत.
- हकीकत:- यातील तक्रारदार यांचा ट्रक द्वारे खडी वाहतूक करण्याचा व्यवसाय असून खडी वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी आणी ट्रक वर कारवाई न करण्यासाठी आरोपी रमजान नजीर शेख वय 28 वर्षे व्यवसाय शेती राहणार मांडवे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी आरोपी लोकसेवक अक्षय ढोबळे तलाठी सजा मांडवे तालुका संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर यांच्या वतीने पंच साक्षीदार समक्ष दिनांक 16/ 4 /2025 रोजी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक अक्षय ढोकळे तलाठी सजा मांडवे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना आरोपी रमजान शेख यांच्या भेटून यांच्या समक्ष मी पन्नास हजार रुपये देतो, पण माझे खडी वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करू नका व सुरळीत राहू द्या असे सांगितले असता, आरोपी लोकसेवक तलाठी अक्षय ढोबळे यांनी मी पैसे घेतो पण गाड्या फक्त दोन महिने चालतील असे म्हणून लाच स्विकारण्यास संमती दिली व आरोपी लोकसेवक व खाजगी इसम यांनी मागणी केलेली 50000 रुपये लाच रक्कम आरोपी रमजान नजीर शेख यांनी दिनांक 16 /4 /2025 रोजी 20 :39 वाजेच्या सुमारास मारुती मंदिर समोर मांडवे, तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्विकारली आहे, तसेच आरोपी लोकसेवक अक्षय ढोकळे तलाठी सजा मांडवे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना लाचेची रक्कम स्विकारण्याबाबत दूरध्वनीवरून कळवून काय करू असे विचारले असता त्यांनी ठीक आहे उद्या बघू असे म्हणून लाच स्विकृतीस संमती दिलेली आहे. सापळा कारवाईत आरोपी खाजगी इसम यास ताब्यात घेण्यात आले आलेले आहे. यातील आलोसे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ व 12 प्रमाणे घारगांवपोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सापळा अधिकारी :– श्री एकनाथ पाटील, पोलीस उप-अधिक्षक ला. प्र.वि. नाशिक
*सापळा कार्यवाही पथक :-
1)पोहवा-सुनिल पवार
2) पोना-योगेश साळवे
3)पोना- परशुराम जाधव
सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नाशिक