नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गाईचे शवविच्छेदन, पोस्टमार्टम करून देण्याच्या मोबदल्यात नंदुरबार जिल्हयातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील पशुवैद्यकिय अधिकारी हर्षल गोपाल पाटील हे ३०० रुपयाची लाच गुगल पे व्दारे स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून शासकीय फीचे १५० रुपये गुगल पे द्वारे घेतले. या नंतर आलोसे यांनी तक्रारदाराकडून ४०० रुपये लाचेची पंचांसमक्ष मागणी केली व तडजोडी अंती ३०० रुपये लाचेची मागणी करुन गुगल पे द्वारे ३०० रुपये रक्कम पंचांसमक्ष स्विकारली. याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नंदुरबार
*तक्रारदार-* पुरूष वय-32
आरोपी लोकसेवक – हर्षल गोपाळ पाटील , वय २९ वर्षे, व्यवसाय -पशुवैद्यकीय अधिकारी , श्रेणी १/ (वर्ग १), पशुवैद्यकीय दवाखाना विसरवाडी, तालुका-नवापूर , जिल्हा- नंदुरबार.
लाचेची मागणी– ४००/- रु.
*तडजोडीअंती स्विकारलेली लाचेची रक्कम- ३०० /- रुपये गुगल पे द्वारे स्वीकारले. या आधि गुगल पे द्वारे शवविच्छेदन फीचे १५०/- रुपये/ स्वीकारले आहेत.
*हकीकत:- तक्रारदार यांची गाय मयत झाली होती. मयत गाईचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते. तक्रारदार यांच्या गाईचे शवविच्छेदन /पोस्टमार्टम करून देण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून शासकीय फीचे १५०/- रुपये गुगल पे द्वारे घेतले. या नंतर आलोसे यांनी तक्रारदाराकडून ४००/- रुपये लाचेची पंचांसमक्ष मागणी केली व तडजोडी अंती ३००/- रुपये लाचेची मागणी करुन आज दिनांक१५/०४/२०२५ रोजी गुगल पे द्वारे ३००/- रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारली आहे. याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
*सापळा अधिकारी :– नेहा तुषार सूर्यवंशी , पोलीस निरीक्षक , लाप्रवि नंदुरबार मो.नं. ७७७४०११०७८
*सापळा पर्यवेक्षण अधिकारी :- श्री राकेश चौधरी, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि,नंदुरबार
*सापळा कार्यवाही पथक :- पोनि/नरेंद्र खैरनार, सपोऊपनि / विलास पाटील , पोहवा/ हेमंत महाले , पोहवा/ विजय ठाकरे, पोहवा/ देवराम गावित, पोहवा/ संदीप खंडारे , पोहवा/जितेंद्र महाले , पोना/सुभाष पावरा , सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार.