नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कर्णबधिर प्रमाणपत्र मिळवून देण्याकरता वैद्यकीय अधिकारी यांच्या नावे ४ हजार ५०० रुपयाची लाच घेतांना धुळे येथे खासगी व्यक्ती कमलाकर उत्तम महानोर एसीबीच्या जाळ्यात सापडला. अगोदर ५ हजाराची मागणी करुन तडजोडी अंती ४ हजार ५०० घेतांना तो रंगेहात सापडला. याप्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे नातेवाईक कर्णबधीर आहेत. त्यांच्यासाठी कर्णबधिर प्रमाणपत्र मिळण्याकरता ऑनलाइन अर्ज केला होता. त्याप्रमाणे महाविद्यालयात जाऊन तपासणी केली त्यानंतर तक्रारदार व पीडित हे कर्णबधिर चे प्रमाणपत्राच्या चौकशी करता वैद्यकीय भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात गेले. कर्णबधिर प्रमाणपत्र मिळवून देण्याकरता वैद्यकीय अधिकारी यांच्या नावे आरोपी यांनी ५ हजार रुपयाची मागणी केली होती. तक्रारदार यांनी तक्रार दिल्याने त्याची त्यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता ४ हजार ५०० रुपये स्वीकारताना आरोपी मिळून आला. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
*युनिट – धुळे
*तक्रारदार-* पुरूष वय- ६६ वर्ष
आरोपी – कमलाकर उत्तम महानोर वय 39 रा. खंडेराव मंदिराजवळ शेलारवाडी चित्तोड रोड धुळे.( खाजगी इसम )
लाचेची मागणी- दि.28/03/2025 रोजी
5000/- रु. मागणी करून तडतोडअंती 4500/- रुपये स्वीकारले आहे.
हकीकत:- तक्रारदार यांचे नातेवाईक पीडित हे कर्णबधीर आहेत पीडित यांचे कर्णबधिर प्रमाणपत्र मिळण्याकरता ऑनलाइन अर्ज केला होता व त्याप्रमाणे महाविद्यालयात जाऊन तपासणी केली त्यानंतर तक्रारदार व पीडित हे कर्णबधिर चे प्रमाणपत्राच्या चौकशी करता वैद्यकीय भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात गेले असता कर्णबधिर प्रमाणपत्र मिळवून देण्याकरता वैद्यकीय अधिकारी यांच्या नावे आरोपी यांनी 5000/- रुपयाची मागणी केली होती बाबत तक्रारदार यांनी तक्रार दिल्याने त्याची त्यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी यांनी पंचासमक्ष. 5,000/-रुपयाची मागणी करून तडजोड अंतिम 4500/- रुपये स्वीकारताना मिळून आले आहे. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया धुळे शहर पोलीस स्टेशन येथे चालू आहे. आरोपीच्या अंगझडतीत मिळुन आलेल्या वस्तु:- लाचेची रक्कम 4500/- रुपये आरोपी च्या ताब्यात मिळून आले आहे.
आरोपीताची घरझडती:- निरंक
- इतर माहीती :-आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
आरोपीचे सक्षम अधिकारी :– निरंक
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा अधिकारी : पंकज शिंदे ,पोलीस निरीक्षक, लाप्रवि धुळे
*सापळा पर्यवेक्षण :- सचिन साळुंखे, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि,धुळे
सापळा कार्यवाही पथक :- पो हवा/ राजन कदम, प्रविण मोरे, संतोष पावरा , मकरंद पाटील, प्रविण पाटील