नाशिक – समाज कल्याण कार्यालयात एका एजंटला ६० हजार रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले आहे. तक्रारदाराचे काम करुन देण्यासाठी या एजंटने ही लाच घेतल्याचे बोलले जात आहे. या कारवाई बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. हा एजंटने आपले वरीष्ठ अधिकारी ओळखीचे असल्याचे समजते. या एजंटने ६० हजारांची रक्कम तक्रारदाराकडून स्विकारतांना लाच लुचपत विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. हा एजंट एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेत असल्यामुळे समाज कल्याण कार्यालयात ही महिला कोण याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही..