इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे दीड लाखाची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात सापडल्या. एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पुल मान्यतेसाठी त्यांनी ही लाच मागितली होती. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
नुकत्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील दोन आमदारांनी त्यांच्या कारभाराबद्दल विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी मांडली होती. त्यातच एसीबच्या अधिका-यांनी धाड टाकून दीड लाख रुपयांची लाच घेतांना त्यांना रंगेहात पकडले व त्यानंतर अटकही केली.
सध्या त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवत येथील तक्रारदाराने क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्विमिंग पुलाला मान्यता देण्यासाठी ही लाच मागितल्याची तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने हा सापळा रचत ही कारवाई केली.