नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये पुरवठादारा यांचे थकीत सुमारे २ कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपया बिल काढण्याच्या मोबदल्यात २ लाख १० हजार रुपयांची लाच घेतांना सुरगाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार हे एसीबीच्या जाळ्यात अडकले.सुरगाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा पोतदार याच्या विरुध्द दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजने मध्ये सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करतात. गट विकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार यांनी तक्रारदार यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये यांचे थकीत सुमारे २ कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपयेचे बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांचेकडे २ लाख १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी नाशिक येथे तक्रार दिली. त्यानंतर एसीबीने पडताळणी करण्यात करुन यांनी सापळा रचला. त्यात २ लाख १० हजार रुपये पंचांसमक्ष स्विकारतांना त्यांना पकडले. सुरगाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचेचा सापळा अहवाल
*युनिट – नाशिक
*तक्रारदार– पुरूष वय- 44 वर्ष
*आरोपी – 1) महेश गोकुळ पोतदार, गट विकास अधिकारी गट- अ (वर्ग 1) , पंचायत समिती, सुरगाणा.
*लाचेची मागणी– दिनांक 25/03/25 रोजी 2 ,10,000/- रुपये
*लाच स्वीकारली -दिनांक 25/03/25 रोजी 2,10,000/रुपये
*हकीकत:- तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजने मध्ये सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करत असून आलोसे महेश गोकुळ पोतदार, गटविकास अधिकारी गट- अ (वर्ग 1) , पंचायत समिती, सुरगाणा. यांनी तक्रारदार यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये यांचे थकीत सुमारे 2 कोटी 32 लाख 30 हजार 27 रुपयेचे बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांचेकडे 2 लाख 10 हजार रुपयांची मागणी केली होती त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे 2,10,000/- रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवून 2,10,000 रुपये पंचांसमक्ष स्विकारले म्हणून सुरगाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल होत आहे.
*आरोपीचे सक्षम अधिकारी : ग्रामविकास सचिव , ग्रामविकास मंत्रालय, मुंबई.
*सापळा अधिकारी :- राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक, लाप्रवि .नाशिक मो.नं. 8208971207
सापळा कार्यवाही पथक :- पो ना/किरण धुळे, पो ना विलास निकम, चालक पो. हवा. संतोष गांगुर्डे.