नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– e चलनासाठी दोन हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती पाचशे रुपये स्वीकारतांना पेठ चेक पॉइंट येथील मोटार परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक नितीन भिकनराव अहिरे यांच्यासह दोन खासगी इसम लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ता असून लोकांसाठी सहलीचे आयोजन करीत असतात २० मार्च रोजी ते साईबाबा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस ने ते छत्रपती संभाजीनगर ,नाशिक येथून अंकलेश्वर गुजरात येथे जात असताना पेठ चेक पॉइंट येथे मोटर वाहन निरीक्षक हे कक्षात हजर असताना त्यांचे समक्ष दोन खाजगी इसम यांनी परराज्यात प्रवेश करण्यासाठी तडजोड रकमेचे (Compound Fees) e चलनासाठी दोन हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती पाचशे रुपये स्वीकारले. वाहतुक निरीक्षक यांनी पहिले खाजगी इसम साळवे यांना लाच रक्कम घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच दुसरे खासगी इसम निकम यांना लाच घेणे आरोपी यांच्यासाठी सुकर होण्यासाठी मदत केली. तक्रारदार यांच्या सोबत असलेला पंच यास चेक पॉईंट कक्षात प्रवेश करण्यापासून अटकाव करून गुन्ह्यास साहाय्य केले.
यशस्वी सापळा कारवाई अहवाल
दि. 20/03/2025
- युनिट- छत्रपती संभाजीनगर
- तक्रारदार- पुरुष, वय-29 वर्ष,
- आलोसे – श्री. नितीन भिकनराव अहिरे वय 49, मोटार वाहन निरीक्षक नेमणूक पेठ चेक पॉइंट, मोटार परिवहन विभाग नाशिक
2) विनोद अर्जुन साळवे वय 47 वर्ष खाजगी इसम
3) मनोहर सुनील निकम वय 27 खाजगी इसम - तक्रार प्राप्त दिनांक- 20/03/2025
-लाच मागणी दिनांक – 20/03/2025
-लाच स्वीकृती दिनांक: 20/03/2025 - लाच मागणी – 2000/-₹ ( दोन हजार रुपये)
- लाच स्विकारली – 500/- पाचशे रुपये)
- ठिकाण- पेठ चेक पॉइंट जिल्हा नाशिक
- आलोसे अंग झडती मिळून आलेल्या वस्तू -Samsung ultra s25 कंपनीचा मोबाईल
- आरोपी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असुन पुढील निरीक्षण करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
-आलोसे यांची घरझडती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. - कारण- तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ता असून लोकांसाठी सहलीचे आयोजन करीत असतात दिनांक 20-03-2025 रोजी ते साईबाबा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस ने ते छत्रपती संभाजीनगर ,नाशिक येथून अंकलेश्वर गुजरात येथे जात असताना पेठ चेक पॉइंट येथे आलोसे हे कक्षात हजर असताना त्यांचे समक्ष आरोपी क्र. 2 )खाजगी इसम यांनी परराज्यात प्रवेश करण्यासाठी तडजोड रकमेचे (Compound Fees) e चलनासाठी दोन हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती पाचशे रुपये स्वीकारले असून आलोसे क्रमांक एक यांनी आरोपी क्र.2) खाजगी इसम यांना लाच रक्कम घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच आरोपी क्रमांक 3.यांनी लाच घेणे आरोपी क्र.2) यांच्यासाठी सुकर होण्यासाठी तक्रारदार यांच्या सोबत असलेला पंच यास चेक पॉईंट कक्षात प्रवेश करण्यापासून अटकाव करून गुन्ह्यास साहाय्य केले
- सापळा अधिकारी- दिलीप साबळे, पोलीस उपाधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मो क्रमांक 9545950421
- सहाय्यक सापळा अधिकारी – वाल्मीक कोरे .पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर