नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शिरपूर येथे पशुपक्षी फार्मचे दुकान सुरू करण्यासाठी लागणा-या परवाण्यासाठी स्थळ परीक्षणासाठी आलेल्या औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी खासगी इसमार्फत ८ हजार रुपयाची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याबरोबरच खासगी इसम तुषार भिकचंद जैन यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना शिरपूर येथे पशुपक्षी फार्मचे दुकान सुरू करावयाचे असल्याने त्यांनी दुकानाचा परवाना मिळणे करिता दि. 25.02.2025 रोजी अन्न व औषध प्रशासन धुळे विभागाकडे ऑनलाइन अर्ज केला होता. सदर अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आते भाऊ यांनी आलो औषध निरीक्षक यांची त्यांचे कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथे खाजगी इसम तुषार जैन यांचे सह दि. 04.03.2025 रोजी त्यांचे दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करतील तेव्हा जैन यांच्याकडे 8,000/- रुपये द्यावे लागतील त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दि.04.03.2025 रोजी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि. 04.03.2025 रोजी पडताळणी केली असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे 8000/- रुपये लाचेची मागणी करून औषध निरीक्षक देशमुख यांनी तक्रारदार यांना लाच देण्यास दुजोरा देऊन प्रोत्साहित केले होते.
दि. 11.03.2025 रोजी सापळा लावला असता खाजगी इसम तुषार जैन यांनी पंचासमक्ष तक्रार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारली तेव्हा आलोसे क्र. 01 व आरोपी क्र. 02 यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. धुळे
तक्रारदार- पुरुष, 34 वर्ष.
आरोपी– 1) किशोर सुभाषराव देशमुख, वय – 44 वर्ष, औषध निरीक्षक (वर्ग 2) धुळे. रा. फ्लॅट नंबर 202, मोरया हाइट्स, मानराज पार्क स्टॉप, नवजीवन सुपर शॉपिंच्या मागे, द्रोपती नगर, जळगाव
2) तुषार भिकचंद जैन, वय- 36 वर्ष, (खाजगी इसम ), रा. मराठी गल्ली, शिरपूर, धुळे
*लाचेची मागणी- दिनांक 04.03.2025 रोजी 8,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 11.03.2025 रोजी 8,000/- रु.
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांना शिरपूर येथे पशुपक्षी फार्मचे दुकान सुरू करावयाचे असल्याने त्यांनी दुकानाचा परवाना मिळणे करिता दि. 25.02.2025 रोजी अन्न व औषध प्रशासन धुळे विभागाकडे ऑनलाइन अर्ज केला होता. सदर अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आते भाऊ यांनी आलो असे क्र. 01 यांची त्यांचे कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथे आरोपी क्र. 02 यांचे सह दि. 04.03.2025 रोजी त्यांचे दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करतील तेव्हा आरोपी क्र. 02 यांच्याकडे 8,000/- रुपये द्यावे लागतील त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दि.04.03.2025 रोजी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि. 04.03.2025 रोजी पडताळणी केली असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे 8000/- रुपये लाचेची मागणी करून औषध निरीक्षक देशमुख यांनी तक्रारदार यांना लाच देण्यास दुजोरा देऊन प्रोत्साहित केले होते.
आज दि. 11.03.2025 रोजी सापळा लावला असता खाजगी इसम तुषार जैन यांनी पंचासमक्ष तक्रार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारली तेव्हा आलोसे क्र. 01 व आरोपी क्र. 02 यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य , मुंबई.
*सापळा पर्यवेक्षण अधिकारी – श्री. सचिन साळुंखे,पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.धुळे*
सापळा व तपासी अधिकारी-
रूपाली रा. खांडवी,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र. विभाग, धुळे
मो.नं. 8379961020
सापळा पथक–
*पो.हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल, पो. कॉ. बडगुजर *सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट* .