नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला म्हणून सटाणा तालुक्यातील तलाठी योगेश जाधव, मंडळ अधिकारी संजय साळी यांच्या विरुध्द सटाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (A), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे मौजे दऱ्हाणे तालुका सटाणा येथील रहिवाशी असून योगेश ज्ञानेश्वर जाधव, तलाठी ठेंगोडा यांनी संजय साळी, मंडळ अधिकारी, सटाणा यांचे सांगणे वरून तक्रारदार यांच्या मुलाने खरेदी केलेल्या शेतीस त्याचे शेतीच्या सातबारा उताऱ्यावर त्याचे नाव लावण्याचे मोबदल्यात त्यांचेकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता १६ डिसेंबर २०२४ रोजी मंडळ अधिकारी यांचे सांगण्यावरून तलाठी यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे १५ हजार रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला म्हणून सटाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (A), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच मागणी कारवाई*
*युनिट – नासिक
*तक्रारदार- पुरूष वय- 43 वर्ष
आरोपी – 1) योगेश ज्ञानेश्वर जाधव, तलाठी, ठेंगोडा,तालुका सटाणा जि नाशिक.
2) संजय गंगाधर साळी, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी कार्यालय, सटाणा जिल्हा नासिक
लाचेची मागणी- दि.16/12/2024 रोजी 15,000/- रु.
*हकीकत:- तक्रारदार हे मौजे दऱ्हाणे तालुका सटाणा येथील रहिवाशी असून आलोसे क्र 1 योगेश ज्ञानेश्वर जाधव, तलाठी ठेंगोडा यांनी अ.क्र. 2 संजय साळी, मंडळ अधिकारी, सटाणा यांचे सांगणे वरून तक्रारदार यांच्या मुलाने खरेदी केलेल्या शेतीस त्याचे शेतीच्या सातबारा उताऱ्यावर त्याचे नाव लावण्याचे मोबदल्यात त्यांचेकडे 25,000 रुपयांची मागणी केली होती त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता दिनांक 16/12/2024 रोजी आलोसे क्र 2 यांचे सांगण्यावरून आलोसे क्र 1 यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे 15,000/- रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला म्हणून सटाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 (A), 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*आरोपीचे सक्षम अधिकारी– जिल्हाधिकारी नाशिक.
*सापळा अधिकारी :- अनिल बडगुजर, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि नाशिक
*सापळा कार्यवाही पथक :– पो हवा/ दिपक पवार, प्रभाकर गवळी, पोलिस शिपाई संजय ठाकरे . चालक विनोद पवार, परशुराम जाधव