नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- निफाड तालुक्यातील शेतजमीनीच्या हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देणेच्या मोबदल्यात साडेतीन लाखाची लाच घेतांना निफाड तालुक्यातील उप भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई नितेंद्र काशिनाथ गाढे हा साडेतीन लाखाची लाच घेतांना एसीबीच्या जाळयात अडकला.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, मावशीची मौजे दीक्षि तालुका निफाड येथे शेतजमीन असून सदर शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे तक्रारदाराने २५ जानेवारी रोजी अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमि अभिलेख कार्यालय इथून २८ फेब्रुवारी रोजी मोजणी झाली होती परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या. लोकसेवक शिपाई गाढे यांनी भाबड साहेब उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून भाबड साहेबांशी बोलून सदरचे काम दिलेल्या तारखेस ७ मार्च रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देणेच्या मोबदल्यात ६ मार्च रोजी स्वतःसाठी व भाबड साहेब यांच्या नावे ४ लाख रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती ३ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष,वय- 36 वर्षे
आलोसे – नितेंद्र काशिनाथ गाढे वय 35 वर्ष पद शिपाई नेमणूक उप अधीक्षक भूमी अभिलेख निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक
लाच मागणी दिनांक 06.03.2025 रोजी चार लाख रुपये तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये
लाच स्वीकारली दिनांक 07.03.2025 रोजी साडेतीन लाख रुपये
तक्रारीचे स्वरूप:–
यातील तक्रारदार त्यांच्या मावशीची मौजे दीक्षि तालुका निफाड येथे शेतजमीन असून सदर शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दिनांक 25. 1.2025 रोजी अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमि अभिलेख कार्यालय इथून दिनांक 28.2. 2018 रोजी मोजणी झाली होती परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या. लोकसेवक शिपाई गाढे यांनी श्री भाबड साहेब उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून भाबड साहेबांशी बोलून सदरचे काम दिलेल्या तारखेस दिनांक 07.03.2025 रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देणे च्या मोबदल्यात दिनांक 06.03.2025 रोजी स्वतःसाठी व भाबड साहेब यांच्या नावे 400000/- रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती 350000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक 07.03.2025 रोजी स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले
*आलोसे सक्षम अधिकारी – मा.उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक
*सापळा अधिकारी – मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस निरीक्षक, ला प्र.वि. नाशिक.
*सापळा पथक – पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके दोघे नेमणूक ला प्र वि नाशिक