नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाळू वाहतुकीची दोन वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली होती व दोन्ही वाहने तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे जमा केली होती. ही दोन वाहने सोडण्याकरता तहसिलदार सारंग चव्हाण, महसूल सहाय्यक हरिष शिंदे व खासगी इसम सलील शेख हे १ लाख १० हजराच्या लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचतप प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा माती व वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांची वाळू वाहतुकीची दोन वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली होती व दोन्ही वाहने तहसिल कार्यालय पैठण येथे जमा केली होती. तहसिल कार्यालयातील काम करणारे खाजगी इसम सलील शेख यांनी तक्रारदार यांची जप्त असलेली वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडण्याकरता स्वतः करीता व तहसिलदार चव्हाण यांचे करिता दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यावेळी वाहने सोडण्याच्य प्रस्तावावर तहसिलदार चव्हाण पैसे दिले शिवाय सही करणार नाही म्हणून नाईलाजास्तव तक्रारदार यांनी खाजगी इसम सलील शेख यांना फोन पे द्वारे ४० हजार रुपये व ५० हजार रुपये रोख स्वरूपात दिले होते. तसेच लोकसेवक शिंदे, महसूल सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्याकडे दंडाच्या रकमेचे चलन काढून देण्याकरिता ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना नाईलाजास्तव २० हजार रुपये दिले होते. प्राप्त लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम सलील शेख यांनी तक्रारदार यांची जप्त असलेली वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडण्याकरता स्वतः करीता व तहसिलदार चव्हाण यांचे करिता १ लाख १० हजार रुपयांची लाच मागणी केली व स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच दिनांक 18/2/2025 रोजी लोकसेवक शिंदे, महसूल सहाय्यक यांनी तक्रारदार यांचे जप्त केलेल्या वाहनातील वाळू त्यांचे घरी टाकण्याचे सांगितल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडे वस्तूच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असून २४ फेब्रुवारी २०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली आहे. दिनांक ३ मार्च रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान यातील खाजगी इसम सलील शेख याने तक्रारदार यांचेकडून पंचा समक्ष लाच रक्कम १ लाख १० हजार रुपये स्वीकारली आहे.
१८ फेब्रुवारी रोजी पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदार यांनी सलील शेख यांना फोन केला असता त्यांनी ते तहसीलदार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगितले व जेव्हा तहसीलदार साहेबांची शासकीय गाडी तहसील कार्यालयात आली त्यावेळी सलील शेख तहसीलदार साहेबांच्या शासकीय गाडीतूनच खाली उतरला. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सलील शेख याचे वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात तहसिल कार्यालयातील तहसिलदार यांच्या सह्या असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाईल मिळून आल्या. सलील याचे मोबाईल मधील व्हाट्सअप चेक केले असता त्यामध्ये सलील याने कार्यालयीन पत्र व्यवहार तहसिलदार यांचे व्हाट्सअप वर पाठवून तो बरोबर आहे का ते चेक करण्यास सांगितले असता त्यांनी बरोबर असल्याचे सांगितले आहे. यावरून तहसिलदार चव्हाण यांनी खाजगी इसम सलील शेख यास तहसिल कार्यालयातील सुविधा पुरवून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करण्यास व स्वीकारण्यास अपप्रेरणा व प्रोत्साहन दिले आहे. सदर बाबत तिन्ही आरोपींविरुद्ध पैठण पोलीस स्टेशन, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- यशस्वी सापळा कारवाई *
युनिट –अहिल्यानगर.
तक्रारदार- पुरुष,वय-32 वर्षे
आरोपी 1) आरोपी खाजगी इसम सलील करीम शेख, वय- 38 वर्षे, व्यवसाय शेती, रा.लक्ष्मी नगर, ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
2) आरोपी लोकसेवक हरिष शिंदे, महसूल सहाय्यक, वर्ग 3, तहसिल कार्यालय पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
3) आरोपी लोकसेवक सारंग भिकूसिंग चव्हाण, वय-48 वर्ष, पद-तहसिलदार पैठण, वर्ग-1, रा.ए विंग, फ्लॅट नंबर 305, द प्राईड इग्निमा, सुतगिरणी चौक, गारखेडा परिसर छत्रपती संभाजी नगर.
*लाचेची मागणी- 1,10,000/- रुपये.
*लाच स्विकारली -ल1,10,000/- रुपये.
*हस्तगत रक्कम- 1,10,000/- रुपये.
*लाचेची मागणी** दि.18/02/2025 व दि.24/02/2025
*लाच स्वीकारली – दि.03/03/2025
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांचा माती व वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांची वाळू वाहतुकीची दोन वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली होती व दोन्ही वाहने तहसिल कार्यालय पैठण येथे जमा केली होती. तहसिल कार्यालयातील काम करणारे खाजगी इसम सलील शेख यांनी तक्रारदार यांची जप्त असलेली वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडण्याकरता स्वतः करीता व तहसिलदार चव्हाण यांचे करिता 2,00,000/- रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यावेळी वाहने सोडण्याच्य प्रस्तावावर तहसिलदार चव्हाण पैसे दिले शिवाय सही करणार नाही म्हणून नाईलाजास्तव तक्रारदार यांनी खाजगी इसम सलील शेख यांना फोन पे द्वारे 40,000/- रुपये व 50,000/- रुपये रोख स्वरूपात दिले होते. तसेच लोकसेवक शिंदे, महसूल सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्याकडे दंडाच्या रकमेचे चलन काढून देण्याकरिता 50,000/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना नाईलाजास्तव 20,000/- रुपये दिले होते. प्राप्त लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 18/02/2025 रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम सलील शेख यांनी तक्रारदार यांची जप्त असलेली वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडण्याकरता स्वतः करीता व तहसिलदार चव्हाण यांचे करिता 1,10,000/- रुपयांची लाच मागणी केली व स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच दिनांक 18/2/2025 रोजी लोकसेवक शिंदे, महसूल सहाय्यक यांनी तक्रारदार यांचे जप्त केलेल्या वाहनातील वाळू त्यांचे घरी टाकण्याचे सांगितल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडे वस्तूच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असून दिनांक 24/2/2025 रोजी तक्रारदार यांच्याकडे 30,000/- रुपये लाचेची मागणी केली आहे. दिनांक 3/3/2025 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान यातील खाजगी इसम सलील शेख याने तक्रारदार यांचेकडून पंचा समक्ष लाच रक्कम 1,10,000/- रुपये स्वीकारली आहे. दिनांक 18/ 2/ 2025 रोजी पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदार यांनी सलील शेख यांना फोन केला असता त्यांनी ते तहसीलदार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगितले व जेव्हा तहसीलदार साहेबांची शासकीय गाडी तहसील कार्यालयात आली त्यावेळी सलील शेख तहसीलदार साहेबांच्या शासकीय गाडीतूनच खाली उतरला. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सलील शेख याचे वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात तहसिल कार्यालयातील तहसिलदार यांच्या सह्या असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाईल मिळून आल्या. सलील याचे मोबाईल मधील व्हाट्सअप चेक केले असता त्यामध्ये सलील याने कार्यालयीन पत्र व्यवहार तहसिलदार यांचे व्हाट्सअप वर पाठवून तो बरोबर आहे का ते चेक करण्यास सांगितले असता त्यांनी बरोबर असल्याचे सांगितले आहे. यावरून तहसिलदार चव्हाण यांनी खाजगी इसम सलील शेख यास तहसिल कार्यालयातील सुविधा पुरवून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करण्यास व स्वीकारण्यास अपप्रेरणा व प्रोत्साहन दिले आहे. सदर बाबत तिन्ही आरोपींविरुद्ध पैठण पोलीस स्टेशन, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे .
सापळा अधिकारी
श्री.अजित त्रिपुटे ,
पोलिस उप अधीक्षक , ला.प्र.वि. अहिल्यानगर.
सापळा पथक
पोलीस निरीक्षक श्री.राजु आल्हाट, पोहेकॉ संतोष शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, गजानन गायकवाड, चापोहेकॉ. हारून शेख, चापोहेकॉ. दशरथ लाड