नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची मागणी करुन तडजोड अंती ४ हजार रुपये लाच घेणा-या एजंट ज्ञानेश्वर एकनाथ बरकलेसह चांदवड तालुक्यातील तलाठी विशाखा भास्कर गोसावी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. या दोघां विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदार यांची वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या तळवाडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात ८ हजार रुपयांची मागणी एजंट यांनी करून तडजोड अंती तलाठी यांचे संमतीने ८ हजार रुपयाची लाच मागणी करून तडजोडीअंती ४ हजार रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आरोपीत क्रमांक एक व दोन यांचे विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, तालुका चांदवड जि. नाशिक येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७अ ,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
यशस्वी सापळा कारवाई ’
*युनिट – नाशिक
*तक्रारदार. पुरूष वय 33 वर्षे
आरोपी –
1) ज्ञानेश्वर एकनाथ बरकले वय ३४ वर्षे, व्यवसाय- खाजगी एजंट, रा. परसुल ता. चांदवड, जि. नाशिक
आरोपीत क्रमांक एक याचे अंग झडती मध्ये एक मोबाईल मिळून आला आहे. पुढील तपासणी चालू आहे.
2) विशाखा भास्कर गोसावी ,वय 37 वर्षे , व्यवसाय- नोकरी तलाठी, शेलु सजा तालुका चांदवड जिल्हा नाशिक.
रा. आर्यवर्त सोसायटी, महाराणा प्रताप चौक, सिडको नाशिक शहर.
आरोपीत क्रमांक दोन यांचेअंग झडती मध्ये एक मोबाईल मिळून आला आहे. पुढील तपासणी चालू आहे.
लाचेची मागणी- 8000/- रुपये ( वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात 8000/-रुपयांची मागणी ) व तडजोड अंती 4000 रुपये
तडजोडी अंती मागणी केलेली व स्विकारली लाचेची रक्कम- दिनांक 03/03/2025 रोजी 4,000/-
- हस्तगत रक्कम-4,000/-
- लाचेची मागणी व स्विकारली-
- दिनांक – 03/03/2025
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांची वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या तळवाडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात 8000/-रुपयांची मागणी एजंट यांनी करून तडजोड अंती तलाठी यांचे संमतीने 8000
रुपयाची लाच मागणी करून तडजोडीअंती 4000 रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आरोपीत क्रमांक एक व दोन यांचे विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, तालुका चांदवड जि. नाशिक येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7अ ,12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
मार्गदर्शन
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक
मो.न. 9371957391
सापळा अधिकारी / दाखल अधिकारी / तपास अधिकारी
श्री. संतोष पैलकर, पोलीस उपअधीक्षक,
ला. प्र. वि. नाशिक
सापळा पथक ’
पो.हे.कॉ./दिनेश खैरनार, अविनाश पवार
चालक-पोलीस शिपाई परशुराम जाधव