नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – fit for duty असा रिमार्क मारून आणून देण्याच्या मोबदल्यात १५०० रुपयाची लाच घेणा-या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कक्ष सेवक नितीन रामचंद्र तिवडे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिेलेली माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय नोकर असून त्यांना अपघात होऊन त्यांच्या हाताच्या उजव्या कोपरास दुखापत झाली होती. सदर बाबत त्यांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते व कर्तव्यावर हजर होणे कामी त्यास शासकीय जिल्हा रुग्णालय, नाशिक येथून fit for duty असे प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालय येथे OPD पेपर काढला होता. तेव्हा सदरील OPD पेपरवर ड्युटीवर असलेल्या डॉक्टर यांनी Pt fit for duty असा रिमार्क मारला. तेव्हा तक्रारदार यांनी त्यांच्याकडे असलेल्या शासकीय रुग्ण निवेदन केलेल्या प्रमाणपत्राच्या पाठमागील बाजूस असलेल्या प्रमाणपत्र यावर सदर नोंद घेण्यास सांगितले असता त्यांनी मामाला जाऊन भेटा ते पुढचे प्रमाणपत्र देतील. त्यावर तक्रारदार हे आरोपी लोकसेवक यास भेटले असता त्यांनी तक्रारदार यास सदरील प्रमाणपत्र यावर fit for duty असा रिमार्क मारून आणून देण्याच्या मोबदल्यात १५०० रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना आरोपी लोकसेवक यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांना संपर्क केला असता तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले व यशस्वी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी मागणी केली केलेली लाचेची रक्कम स्वीकारली व तक्रारदार यांच्याकडे असलेल्या सिक पास वर fit for duty असा रिमार्क मारून Medical officer CL -2, General Hospital, Nashik असा शिक्का मारून दिला म्हणून आरोपी लोकसेवक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार – पुरुष, वय – 33 वर्षे
आरोपी नामे – नितीन रामचंद्र तिवडे, वय – 56 वर्षे, धंदा – नोकरी, कक्ष सेवक, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक राहणार – शिवपुष्प सोसायटी, रो हाऊस नंबर 23, मीरा द्वार लॉन्स समोर, माने नगर, मेरी- रासबिहारी लिंक रोड नासिक.
*लाचेची मागणी – 1500 रुपये.
*लाच स्विकारली – 1500/- रू.
*हस्तगत रक्कम – 1500/- रुपये.
*लाचेची मागणी – दिनांक 21/02/2025
*लाच स्वीकारली – दिनांक 21/02/2025
*लाचेचे कारण :- यातील तक्रारदार हे शासकीय नोकर असून त्यांना अपघात होऊन त्यांच्या हाताच्या उजव्या कोपरास दुखापत झाली होती. सदर बाबत त्यांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते व कर्तव्यावर हजर होणे कामी त्यास शासकीय जिल्हा रुग्णालय, नाशिक येथून fit for duty असे प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालय येथे OPD पेपर काढला होता. तेव्हा सदरील OPD पेपरवर ड्युटीवर असलेल्या डॉक्टर यांनी Pt fit for duty असा रिमार्क मारला. तेव्हा तक्रारदार यांनी त्यांच्याकडे असलेल्या शासकीय रुग्ण निवेदन केलेल्या प्रमाणपत्राच्या पाठमागील बाजूस असलेल्या प्रमाणपत्र यावर सदर नोंद घेण्यास सांगितले असता त्यांनी मामा ला जाऊन भेटा ते पुढचे प्रमाणपत्र देतील. त्यावर तक्रारदार हे आरोपी लोकसेवक यास भेटले असता त्यांनी तक्रारदार यास सदरील प्रमाणपत्र यावर fit for duty असा रिमार्क मारून आणून देण्याच्या मोबदल्यात 1500/- रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना आरोपी लोकसेवक यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांना संपर्क केला असता तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले व यशस्वी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी मागणी केली केलेली लाचेची रक्कम स्वीकारली व तक्रारदार यांच्याकडे असलेल्या सिक पास वर fit for duty असा रिमार्क मारून Medical officer CL -2, General Hospital, Nashik असा शिक्का मारून दिला म्हणून आरोपी लोकसेवक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
*सापळा व तपास अधिकारी – श्री. संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक – पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे