नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- निफाड तालुक्यातील जळगांव ग्रामपंचायतीची बख्खळ जागा गणेश निरभवणे यांचे बेघर म्हणुन नावे करून देण्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणुन प्रथम पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करुन ३००० रुपये स्विकारतांना ग्रामसेवक किरण दौलत काकीपुरे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार गणेश अरूण निरभवणे यांचे वडिलांचे मालकीचे जळगांव ग्रामपंचायत हद्दीतील घरालगत असलेली जळगांव ग्रामपंचायतीची बख्खळ जागा तक्रारदार फिर्यादी श्री. गणेश निरभवणे यांचे बेघर म्हणुन नावे करून देण्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणुन प्रथम ५ हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक 19/02/2025 रोजी तडजोडीअंती ३ हजार रुपयाची लाचेची मागणी केलेली रक्कम दिनांक 20/02/2025 रोजी 13:14 वाजेचे सुमारास जळगांव ग्रामपंचायतीचे कार्यालय, जि. नाशिक येथे ३ हजार रुपये स्विकारून स्वतःसाठी ठेवुन घेतले असता रंगेहाथ पकडण्यात आले असुन, आलोसे यांचे विरुध्द निफाड पोलीस स्टेशन , नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
’यशस्वी सापळा कारवाई’’
-’युनिट .’ नाशिक
- ’तक्रारदार.’ पुरूष वय. 34
- आलोसे. श्री. किरण दौलत काकीपुरे, वय 38 वर्षे व्यवसाय- नोकरी (ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) नेमणुक जळगांव ग्रामपंचायत, जळगांव, ता. निफाड, जि. नाषिक) राहणारः रो-हाऊस नं. 5, साई रेसिडन्सी, स्वामी समर्थ मंदिरा जवळ, मखमलाबाद, ता. जि. नाषिक 422003
- ’लाचेची मागणी – सुरूवातीस 5,000/- (पाच हजार रुपये ) नंतर 3,000/-रू.तडजोडी अंती
- ’लाच स्विकारली – 3,000/- रू. स्विकारले
- ’हस्तगत रक्कम – 3000 रू.
- ’लालेची मागणी – 19/02/2025
- ’लाच स्विकारली – 20/02/2025
- तक्रार-वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील तक्रारदार/ फिर्यादी श्री. गणेश अरूण निरभवणे यांचे वडिलांचे मालकीचे जळगांव ग्रामपंचायत हद्दीतील घरालगत असलेली जळगांव ग्रामपंचायतीची बख्खळ जागा तक्रारदार/फिर्यादी श्री. गणेश निरभवणे यांचे बेघर म्हणुन नावे करून देण्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणुन प्रथम 5000/-रू लाचेची मागणी करून दिनांक 19/02/2025 रोजी तडजोडीअंती 3,000/-रू.ची लाचेची मागणी केलेली रक्कम दिनांक 20/02/2025 रोजी 13:14 वाजेचे सुमारास जळगांव ग्रामपंचायतीचे कार्यालय, जि. नाशिक येथे 3,000/-रू. स्विकारून स्वतःसाठी ठेवुन घेतले असता रंगेहाथ पकडण्यात आले असुन, आलोसे यांचे विरुध्द निफाड पोलीस स्टेशन , नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा नाशिक
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- ’सापळा अधिकारी – नितीन पाटील पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. नाशिक मो.न. 9284661658
- ’सापळा पथक –पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव