नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याच्या भूमापन कार्यालयातील खासगी कर्मचारी याने तक्रारदार यांच्याकडे साहेबांकडून सदर काम करुण आणून देण्याच्या मोबदल्यात १००० रुपये लाच घेतली. या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याच्या साठी नमुद खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडे नगर भुमापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून सदर काम करुण आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे प्रथम प्रत्येक नोंद घेण्यासाठी १५ हजार व कामाला सुरूवात करुन देण्यासाठी १५०० रुपयाची मागणी करून तडजोडीअंती १००० रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आरोपी यांचे विरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगांव, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यशस्वी सापळा कारवाई ’
*युनिट – जळगांव
*तक्रारदार* .’ पुरूष वय 30 वर्षे
आरोपी – अविनाश सदाशिव सनंसे वय 49 वर्षे, व्यवसाय- खाजगी कर्मचारी, नगर भुमापन अधिकारी कार्यालय, जळगांव.( खाजगी इसम)
लाचेची मागणी- 15000 रुपये ( प्रत्येक नोंद घेण्यासाठी प्रत्येकी 5000 रुपये ) व कामाला सुरूवात करुन देण्यासाठी 1500 व तडजोड अंती 1000
तडजोडी अंती मागणी केलेली व स्विकारली लाचेची रक्कम- दिनांक 18/02/2025 रोजी 1000/-
*हस्तगत रक्कम-1000/-
- लाचेची मागणी व स्विकारली-
- दिनांक 18/02/2025
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याच्या साठी नमुद खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडे नगर भुमापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून सदर काम करुण आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे प्रथम प्रत्येक नोंद घेण्यासाठी 15000 व कामाला सुरूवात करुन देण्यासाठी 1500 रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 1000 रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आरोपी यांचे विरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगांव, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल प्रकिया चालू आहे.
*हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*पर्यवेक्षण अधिकारी- श्री योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि जळगांव
सापळा अधिकारी / दाखल अधिकारी / तपास अधिकारी
श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. जळगांव
सापळा पथक – पोकॉ/ राकेश दुसाणे, पो कॉ/ अमोल सुर्यवंशी