नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मेहु येथील सरपंच जिजाबाई गणेश पाटील, सरपंच यांचा मुलगा शुभम गणेश पाटील, सरपंचाचे पती गणेश सुपडू पाटील व खासगी व्यक्ती समाधान पाटील हे ४० हजार रुपयाच्या लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात सापडले. व्यायाम शाळेचे काम केलेल्या बांधकाम कंपनीला उर्वरित ३ लाखाचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितलेली माहिती अशी की, तक्रारदार हे सन २०१७-१८ ते सन २०२२-२३ मध्ये मेहू गावाचे सरपंच होते. त्या दरम्यान ग्रामपंचायत मेहु यांनी मेहु गावात व्यायाम शाळा बांधण्यासाठी काम दिले होते. सदर व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय जळगांव यांच्या मार्फतीने ७ लाख रुपयाचा निधी ग्रामपंचायत मेहु यांनी मंजुर केला होता. त्यानंतर २०२३ मध्ये जिजाबाई गणेश पाटील यांची मेहु गावाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी सरपंच पाटील यांना व्यायाम शाळेच्या मंजुर निधीची मागणी संबंधित construction कंपनी च्या वतीने केली असता सरपंच पाटील यांनी त्यांना प्रथम ४ लाख रुपयाचा धनादेश संबंधित कंपनीच्या नावाने दिला व उर्वरित ३ लाख रुपयाचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात सरपंच यांनी ३१ जानेवारी रोजी तक्रारदार यांच्या कडून १ लाख, ७० हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तसेच आरोपी सरपंचाचे पती यांनी तडजोडीअंती ४० हजार रु लाच रक्कम मागितली. सदर लाच रक्कम देण्यास सरपंचाचा मुलगा यांच्या सांगण्यावरून खालही व्यक्ती समाधान देवसिंग पाटील याने लाच रक्कम स्वीकारली म्हणून पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – जळगाव.
*तक्रारदार- पुरुष,वय-47
*आलोसे 1) जिजाबाई गणेश पाटील ,वय 43 वर्ष , व्यवसाय सरपंच , मेहु ता पारोळा जि.जळगाव.
2) शुभम गणेश पाटील( देवरे) , वय 26 वर्ष शिक्षण ( सरपंच यांचा मुलगा )
3) गणेश सुपडू पाटील ,वय 55 वर्ष शेती. तिन्ही रा. मेहु ता. पारोळा जि. जळगांव ( सरपंच पती)
4) समाधान देवसिंग पाटील वय 35 वर्ष, व्यवसाय- खाजगी सेतु सुविधा केंद्र रा. बोदडे ता पारोळा .
*लाचेची मागणी- प्रथम 1,00.000, 70,000 व तडजोडीअंती 40,000 रू
*तडजोडीअंती मागणी केलेली व स्विकारलेली लाचेची रक्कम
दि.12/02/2025 रोजी 40,000/-
*हस्तगत रक्कम- 40,000/-
( तसेच आरोपी क्रमांक 2 याचे कडून 3,00,000 रुपयाचा गुन्ह्याशी संबंधित मूळ धनादेश घटनास्थळावरून )
*लाचेची मागणी- दि.31/01/2025- दि.03/02/2025
*लाच स्विकारली – दि.12/02/2025
लाचेचे कारण*
यातील तक्रारदार हे सन 2017-18 ते सन 2022- 23 मध्ये मेहू गावाचे सरपंच होते. त्या दरम्यान ग्रामपंचायत मेहु यांनी मेहु गावात व्यायाम शाळा बांधण्यासाठी काम दिले होते. सदर व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय जळगांव यांच्या मार्फतीने 7,00,000/- रु निधी ग्रामपंचायत मेहु यांनी मंजुर केला होता. त्यानंतर सन 2023 मध्ये आरोपी क्र. 1 यांची मेहु गावाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपी क्र. 1 यांना व्यायाम शाळेच्या मंजुर निधीची मागणी संबंधित construction कंपनी च्या वतीने केली असता आरोपी क्र.1 यांनी त्यांना प्रथम 4,00,000/- रु चा धनादेश संबंधित कंपनीच्या नावाने दिला व उर्वरित 3,00,000/- रू रक्कमेचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात आरोपी क्र. 1 यांनी दि.31-01-2025 रोजी तक्रारदार यांच्या कडून 1,00,000, 70,000/- रू लाचेची मागणी केली. तसेच आरोपी क्र. 3 यांनी तडजोडीअंती 40,000/- रु लाच रक्कम मागितली.सदर लाच रक्कम देण्यास आरोपी क्र. 2 यांनी प्रोत्साहन देऊन आज रोजी आरोपी क्र 2 यांच्या सांगण्यावरून आरोपी क्र 4 यांनी लाच रक्कम स्वीकारली म्हणून पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
- आरोपीच्या अंगझडतीत मिळून आलेल्या वस्तु
- आरोपी क्र.2 यांचे अंगझडीत 3600 रु. मिळून आले आहे .
- आरोपी क्र .3 यांचे अंगझडतीत 5170 रु . मिळून आले आहे .
- आरोपी क्र.4 यांचे अंगझडतीत 1400 रू . मिळून आले
- आरोपीताची घरझडती – आरोपीताची घरझडती सुरू आहे
- इतर माहिती आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- आरोपी यांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले असुन पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- पर्यवेक्षण अधिकारी- श्री योगेश ठाकूर ,पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव
- सापळा अधिकारी व तपास अधिकारी- श्रीमती नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक, ला प्र.वि जळगाव
- सापळा पथक – GPSI दिनेशसिंग पाटील, GPSI सुरेश पाटील, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी