नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच घेतांना धुळे येथील नगर भूमापन अधिकारी भास्कर गंगाधर वाघमोडे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी सदर प्लॉटच्या मूळ मालकाने नगर भूमापन कार्यालय, धुळे येथे अर्ज केलेला होता. सदर अर्जावरून भूमापन अधिकारी भास्कर गंगाधर वाघमोडे यांनी क्षेत्र दुरुस्ती करण्याचे आदेश काढले होते. सदर आदेशावरून मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी आलोसे यांनी २० हजार रुपयाची लाचेची मागणी करून दहा हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारून उर्वरित १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता भूसंपादने अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील परिरक्षण भूमापक हर्षल खोंडे यांच्याकरिता १० हजार रुपयाची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांचे कडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे म्हणून गुन्हा दाखल कऱण्यात आला.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. धुळे
तक्रारदार- पुरुष, 62 वर्ष.
आरोपी– भास्कर गंगाधर वाघमोडे,वय- 55 वर्ष ,पद- नगर भूमापन अधिकारी धुळे, वर्ग-2 रा.सुयोग कॉलनी,जि.टी.पी स्टॉप, देवपूर, धुळे,जि. धुळे.
*लाचेची मागणी- दि. 15.1.2025 व दि.16.1.2025 रोजी 20,000/-रु.
*लाच स्वीकारली* दि. 23.1.2025 रोजी 10,000/-रु.
लाचेचे कारण – तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी सदर प्लॉटच्या मूळ मालकाने नगर भूमापन कार्यालय, धुळे येथे अर्ज केलेला होता. सदर अर्जावरून आलोसे यांनी क्षेत्र दुरुस्ती करण्याचे आदेश काढले होते.सदर आदेशावरून मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी आलोसे यांनी 20,000/-रु.लाचेची मागणी करून 10,000/-रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारून उर्वरित 10,000/-रु लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी त्यांच्या कार्यालयातील परिरक्षण भूमापक हर्षल खोंडे यांच्याकरिता 10,000/-रु. लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांचे कडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी– *मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे.
*परिवेक्षण अधिकारी – श्री सचिन साळुंखे*
पोलीस उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग धुळे
सापळा अधिकारी-पंकज शिंदे
. पो. निरी.,ला.प्र. विभाग, धुळे*
सापळा पथक– पो. हवा. राजन कदम, पो.कॉ.रामदास बारेला,मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट .