नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रथम २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाच स्वीकारतांना मराविवि कंपनीचे उप कार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांनी एका खाजगी कंपनीचा NSC या स्किम अंतर्गत नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ १०० वॅट हून २०० वॅट करण्याकरीताचा प्रस्ताव आलोसे यांचेकडे कार्यकारी अभियंता याना पाठविण्यासाठी प्रलंबित होता. सदरचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता , भुसावळ यांचेकडे पाठविण्यासाठी इंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. म्हणून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे आज रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील इंगळे यांनी प्रथम २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाच घेण्याचे मान्य करुन आज रोजी लाचेची २० हजार रुपये रक्कम स्वीकारली म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आलोसेच्या टेबल वरून तक्रारदार यांचा प्रलंबित कामाचा प्रस्ताव तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-49, रा. भुसावळ .जि. जळगांव
*आलोसे-प्रशांत प्रभाकर इंगळे, वय 46 वर्ष , व्यवसाय नोकरी , उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि कंपनी मर्या .भुसावळ ( वर्ग-2) नेमणूक :- उप कार्यकारी अभियंता कार्यालय (चोरवड) भुसावळ , जिल्हा जळगाव
*लाचेची मागणी- प्रथम 25000/-, रुपये तडजोडीअंती 20000/-
*लाच स्विकारली- 20000/-
*हस्तगत रक्कम- 20,000/-
*लाचेची मागणी – दि.22/01/2025
*लाच स्विकारली – दि.22/01/2025
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असुन त्यांनी एका खाजगी कंपनीचा NSC या स्किम अंतर्गत नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ 100 वॅट हून 200 वॅट करण्याकरीताचा प्रस्ताव आलोसे यांचे कडे कार्यकारी अभियंता याना पाठविण्यासाठी प्रलंबित होता. सदरचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता , भुसावळ यांचेकडे पाठविण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. म्हणून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे आज रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी प्रथम 25 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य करुन आज रोजी लाचेची 20 हजार रुपये रक्कम स्वीकारली म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आलोसे च्या टेबल वरून तक्रारदार यांचा प्रलंबित कामाचा प्रस्ताव तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*पर्यवेक्षण अधिकारी – श्री योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि जळगांव
*सापळा अधिकारी व तपास अधिकारी- श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, ला प्र.वि जळगाव
*सापळा पथक – पोना बाळू मराठे, पोकॉ अमोल सुर्यवंशी