नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण विस्तार अधिकारी यांनी इन्स्पेक्शन मध्ये चांगला शेरा लिहावा म्हणून शिक्षकांकडून १ हजार रुपये घेणा-या जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिपळकोठा शाळेतील मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. तर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी हे संशयीत आहे.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार हे प्राथमिक शाळा पिपळकोठे येथे शिक्षक या पदावर नेमणुकीस आहेत. यातील संशयीत आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी यांनी गेल्या सोमवारी त्यांच्या शाळेचे इन्स्पेक्शन केले होते. शिक्षण विस्तार अधिकारी यांनी इन्स्पेक्शन मध्ये चांगल्या शेरा लिहावा म्हणून १० हजार रुपये मागितले आहेत ते सर्व शिक्षकांना द्यावे लागतील असे सांगुन इतर शिक्षकाकडून प्रत्येकी १ हजार रूपये घेतले होते. तक्रारदार व अन्य एक शिक्षक यांचे असे एकूण दोन हजार रुपये बाकी होते. त्याबाबत तक्रारदार यांचेकडुन १ हजार रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक यांनी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे साक्षीदार शिक्षक व पंचासमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक यांनी संशयीत शिक्षण विस्तार अधिकारी यांनी १० हजार सांगितले आहेत. तुम्हाला यावेळी पैसे द्यावेच लागतील असे सांगुन तक्रारदार यांचेकडून १ हजार रुपये लाचेची मागणी केली. आज रोजी १ हजार रुपये लाच रक्कम घेताना मुख्याध्यापकांना पिपळकोठा ता.एरंडोल येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तर अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी दोन हजार रुपये मिळल्या बाबत विरोध दर्शवला नाही व नंतर कॉल करतो असे सांगून लाच रकमेबाबत कोणताही विरोध दर्शवला नाही. सदर बाबत अधिक तपास करून संशयित आरोपी यांच्याविरुद्ध कारवाई करीत आहोत. तसेच एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-37 रा. पारोळा जि.जळगांव
आलोसे- 1) बळीराम सुभाष सोनवणे, वय 55 वर्ष व्यवसाय नोकरी , मुख्याध्यापक, जि.प. मराठी शाळा पिपळकोठा ता. एरंडोल जि.जळगांव 2) संशईत आलोसे – जे डी पाटिल शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, एरंडोल
लाचेची मागणी- 10,000/-
लाच स्विकारली- -1000/ रुपये
हस्तगत रक्कम-1000/-रुपये
लालेची मागणी- दि.20/01/2025
लाच स्विकारली दि.20/01/2025
लाचेचे कारण
यातील तक्रारदार हे प्राथमिक शाळा पिपळकोठे येथे शिक्षक या पदावर नेमणुकीस आहेत व आलोसे क्र. 1 हे मुख्याध्यापक आहेत. यातील संशईत आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी यांनी गेल्या सोमवारी त्यांच्या शाळेचे इन्स्पेक्शन केले होते. शिक्षण विस्तार अधिकारी यांनी इन्स्पेक्शन मध्ये चांगल्या शेरा लिहावा म्हणून 10 हजार रुपये मागितले आहेत ते सर्व शिक्षकांना द्यावे लागतील असे सांगुन इतर शिक्षकाकडून प्रत्येकी 1000/- रू. घेतले होते. तक्रारदार व अन्य एक शिक्षक यांचे असे एकूण 2000/- रु. बाकी होते. त्याबाबत तक्रारदार यांचेकडुन 1000/-रुपये लाचेची मागणी आलोसे मुख्याध्यापक यांनी केली होती.त्याबाबत तक्रारदार यांनी आज रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे साक्षीदार शिक्षक व पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी संशईत आलोसे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी 10 हजार सांगितले आहेत तुम्हाला यावेळी पैसे द्यावेच लागतील असे सांगुन तक्रारदार यांचेकडून 1000/- रू . लाचेची मागणी करुन आज रोजी 1000 रुपये लाच रक्कम घेताना आलोसे यांना मुख्याध्यापक कार्यालय पिपळकोठा ता.एरंडोल येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तर अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी 2000/- रु.मिळल्या बाबत विरोध दर्शवला नाही व नंतर कॉल करतो असे सांगून लाच रकमेबाबत कोणताही विरोध दर्शवला नाही. सदर बाबत अधिक तपास करून संशयित आरोपी यांच्याविरुद्ध कारवाई करीत आहोत. तसेच एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- सापळा व तपास अधिकारी
श्री. योगेश ठाकूर,पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.9702433131 - सापळा पथक
सफौ सुरेश पाटील, चालक
पो.ना. बाळू मराठे
पोकॉ राकेश दुसाने