नाशिक – तक्रारदार यांचे बाबत असलेल्या अर्जामध्ये कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून २५ हजार लाच स्विकारतांना नामपूर येथे पोलिस निरीक्षक मिलिंद नवगिरे व दोन हजाराची लाज घेतांना खासगी इसम रमेश गरुड लाच लुचपत विभागाच्या सापळयात अडकले. या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी इसम गरुड याचे मार्फत तीस हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोड अंती नवगिरे यांनी २५ हजार स्विकारले व खासगी इसम गरुड यांनी स्वतः साठी दोन हजार स्विकारले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा कारवाई
▶️ *युनिट -* नाशिक.
▶️ *तक्रारदार- पुरूष , वय – 49 वर्ष,
▶️ *आरोपी-* मिलिंद मुरलीधर नवगिरे,
वय – 35 वर्ष, व्यवसाय- नौकरी, पोलीस उपनिरीक्षक, नामपुर पोलीस दुरक्षेत्र ,
जायखेडा पोलीस स्टेशन, ता. बागलाण जि.नासिक वर्ग-2.
२) रमेश कचरू गरूड , वय- 50 वर्ष,
रा. काकडगाव ता. बागलाण, जिल्हा नाशिक. खाजगी इसम
▶️ *लाचेची मागणी* – 27 ,000/-₹
▶️ *लाच स्वीकारली* – 27000/-
▶️ * हस्तगत रक्कम -* रु.27000/
▶️ *लाचेची मागणी -* ता.31/08/2021
▶️ *लाचेची स्वीकारली -* ता.01/09/2021
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार यांचे बाबत असलेल्या अर्जामध्ये कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांना आलोसे क्र. 1 यांनी खाजगी इसम गरुड याचे मार्फत 30000/- रु. लाचेची मागणी करुन तडजोड अंती 25000/-रु. स्विकारले व खासगी इसम गरुड यांनी स्वतः साठी 2000/- रु. स्विकारले म्हणून गुन्हा. ▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आले आहेत.
▶️ *सापळा अधिकारी * श्री उज्ज्वलकुमार पाटील ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक.
सह अधिकारी- श्री.प्रशांत सपकाळे , पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.नाशिक
▶️ *सापळा पथक -* पोहवा/ माळी, पोना / बाविस्कर, पोना / प्रकाश महाजन
सर्व नेमणूक- लाप्रवि, नाशिक.
▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*2)* मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री.नरेंद्र पवार,
उपअधीक्षक, वाचक, लाप्रवि, नाशिक
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई. सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक
@ टोल फ्रि क्रं. 1064