नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा हजार रुपयाची लाच घेतांना नाशिक जिल्ह्यातील देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास जगताप हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्यावर देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात अटक न करता नोटीस अदा करण्याकामी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास जगताप यांनी २० हजार रुपयाची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये घेतांना व यापूर्वी २ लाख पाच हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून रंगेहाथ मिळून आले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अ अन्वये गुन्हा आहे. नमूद गुन्हा देवळा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्याचे काम सुरु आहे.
’यशस्वी सापळा कारवाई’’
- ’युनिट .’ नाशिक
- ’तक्रारदार.’ पुरूष वय 31 वर्षे
-1) आलोसे. श्री. कैलास यशवंत जगताप वय 54 वर्षे, व्यवसाय-नोकरी. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवळा पोलीस स्टेशन वर्ग -3
मु . पोस्ट – मुंजवाड (ग्रामपंचायत समोर ) तालुका – सटाणा जिल्हा नाशिक - ’लाचेची मागणी – 20,000/-
- ’लाच स्विकारली – 10,000/-
- ’हस्तगत रक्कम. 10,000/-
- ’लाचेची मागणी – दिनांक -18/1/2025 रोजी
- ’लाच स्विकारली – दिनांक -18/1/25 रोजी
- लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांच्यावर देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात अटक न करता नोटीस अदा करण्याकामी तसेच गुन्ह्यात मदत करण्याकामी यातील आलोंसे यांनी 20,000/-रुपयाची मागणी करून त्यापैकी आज 10,000/-घेतांना व यापूर्वी 2 लाख पाच हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून रंगे हाथ मिळून आला म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम. 7 अ अन्वये गुन्हा आहे. नमूद गुन्हा देवळा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्याचे काम सुरु आहे .
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी– मा.पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांना कळविण्यात आले आहे .
- *सापळा अधिकारी-
*श्री. एकनाथ गं.पाटील पोलीस उपअधिक्षक*
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक .
मो.न.9823843258* - सापळा पथक–
पोहवा.सुनील पवार ,
पोहवा संदीप वणवे
पोहवा . योगेश साळवे चालक -परशुराम जाधव
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक युनिट .