नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत भरवज येथील ग्रामसेवक सुवर्णा आहेर यांनी तक्रारदार यांच्याकडे ठराव देण्याचा मोबदल्यात २० हजार रुपयाची लाच घेतली. त्यांच्या विरुध्द घोटी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे शेती व जमीन खरेदी विक्री खाजगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्यांचे मित्र मिळून त्यांनी आदिवासी जमीन ही बिगर आदिवासी व्यक्तीचा नावे खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे अर्ज सादर केला असता सदर प्रकरणाची चौकशी अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय भरवज ता.इगतपुरी यांच्याकडे आदिवासी व्यक्ती ते बिगर आदिवासी प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कडील ठराव घेण्यात यावा याबाबत तहसीलदार इगतपुरी यांनी आदेशीत केले असता तक्रारदार हे सदर ठराव बाबत ग्रामपंचायत भरवज ता.इगतपुरी यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता तेथील ग्रामसेवक सुवर्णा आहेर मॅडम यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर ठराव देण्याचा मोबदल्यात ३० हजार रुपयाचे पंचासमक्ष मागणी करून ती आज रोजी ३० हजार रुपये लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आलोसे यांचे विरुध्द घोटी पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ लाच मागणी प्रकरणी कारवाई’
- ’युनिट .’ नाशिक
- ’तक्रारदार.’ पुरूष वय 40 वर्षे
- आलोसे. श्रीमती सुवर्णा छगन आहेर वय 39 वर्षे, व्यवसाय-नोकरी ,ग्रामसेवक,
वर्ग-3 - मागणी केलेली लाचेची रक्कम – 50,000
- तडजोडीअंती लाच मागणी रक्कम – 30,000/-₹रुपये
- स्वीकारली रक्कम -20,000/-रुपये
- हस्तगत रक्कम – 20,000/- रुपये
- ’पडताळणी दिनांक- दिनांक 03/12/2024 रोजी
- यशस्वी सापळा :- दिनांक 7/01/2025 रोजी
- तक्रार- यातील तक्रारदार हे शेती व जमीन खरेदी विक्री खाजगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्यांचे मित्र मिळून त्यांनी आदिवासी जमीन ही बिगर आदिवासी व्यक्ती चा नावे खरेदी करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे अर्ज सादर केला असता सदर प्रकरणाची चौकशी अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय भरवज ता.इगतपुरी यांच्याकडे आदिवासी व्यक्ती ते बिगर आदिवासी प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कडील ठराव घेण्यात यावा याबाबत मा.तहसीलदार इगतपुरी यांनी आदेशीत केले असता तक्रारदार हे सदर ठराव बाबत ग्रामपंचायत भरवज ता.इगतपुरी यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता तेथील ग्रामसेवक श्री. सुवर्णा आहेर मॅडम यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर ठराव देण्याचा मोबदल्यात 30 हजार रुपयाचे पंचासमक्ष मागणी करून ती आज रोजी 20,000/- रुपये लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आलोसे यांचे विरुध्द घोटी पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- ’सापळा अधिकारी व दाखल अधिकारी व तपास अधिकारी
श्री. अमोल सदाशिव वालझाडे
पोलीस निरीक्षक
ला. प्र. वि. नाशिक - ’सापळा पथक’
पोहवा /संदीप हांडगे
पोना/ सुरेश चव्हाण
मपोना/ राजश्री अहिरराव
चापोहवा / संतोष गांगुर्डे