बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाच हजाराच्या लाच प्रकरणात तलाठीसह दोन खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
जानेवारी 8, 2025 | 4:41 pm
in स्थानिक बातम्या
0
acb


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
मुक्ताईनगर येथील काकोडा येथील तलाठी प्रशांत ढमाळेसह खासगी पंटर अरुण भोलानकर, संतोष उबरकर हे पाच हजाराच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या तिघांवर मुक्ताईनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे आजोबा यांचे नावे कुऱ्हा ता. मुक्ताईनगर येथे शेती असून त्यांच्या आजोबाचे १९९७ मध्ये निधन झाले आहे. तेव्हा पासुन तक्रारदार यांचे वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे यांचे सात बारा उताऱ्यावर नाव लावणे बाकी होते. त्यासाठी तक्रारदार यांनी मागील ७ ते ८ दिवसापूर्वी कुऱ्हा गावातील तलाठी याची भेट घेतली असता यातील तलाठी यांनी तक्रारदार यांना तुम्हाला प्रत्येक वर्षाचे २२० रुपये या प्रमाणे ६००० रुपये शासकीय फी भरावी लागेल. जर तुम्हाला शासकीय फी भरायची नसेल तर मला पाच हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते, त्या बाबत यातील तक्रारदार यांनी दिनांक 01/01/2025 रोजी ला. प्र. वि. जळगांव घटकांकडे तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची दिनांक 01/01/2025 रोजी पडताळणी केली असता यातील तलाठी व दोन खासगी व्यक्ती तक्रारदार यांचे 7/12 उताऱ्यावर त्याचे वडील, काका, आत्या व मयत काकाच्या मुलाचे नाव लावण्याचे मोबदल्यात पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर आज सदर लाच रक्कम आरोपी खासगी पंटर यांचे सांगणे वरून खासगी व्यक्ती यांनी पाच हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्विकारताना त्यांना रांगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर मुक्ताईनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-30 रा. जळगांव

  • आलोसे क्रमांक 1) प्रशांत प्रल्हाद ढमाळे, वय 42 वर्ष, व्यवसाय – तलाठी, सजा काकोडा ता. मुक्ताईनगर, रा. चिखली रानखांब ता. मलकापूर जि. बुलढाणा ह. मु. गणपती नगर, भाग 5 मलकापूर ता. मलकापूर जि.बुलढाणा (खाते महसूल वर्ग 3)

आरोपी क्रमांक 2 ) अरुण शालीग्राम भोलानकार,वय 32 वर्ष, व्यवसाय खाजगी पंटर, रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव (खासगी पंटर)
आरोपी क्रमांक 3) संतोष प्रकाश उबरकर , वय 25 वर्ष, खाजगी इसम रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव (खासगी इसम)

*लाचेची मागणी- 5,000/- रुपये
*लाच स्विकारली- 5,000/-
*हस्तगत रक्कम- 5,000/-
*लाचेची मागणी – दि.01/01/2025
*लाच स्विकारली – दि.08/01/2025

  • लाचेचे कारण- यातील तक्रारदार यांचे आजोबा यांचे नावे कुऱ्हा ता. मुक्ताईनगर येथे शेत गट क्र.167/18 असा असुन तक्रारदार यांचे आजोबा हे सन 1997 मध्ये मयत झाले आहे. तेव्हा पासुन तक्रारदार यांचे वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे यांचे 7/12 उताऱ्यावर नाव लावणे बाकी होते. त्यासाठी तक्रारदार यांनी मागील 7 ते 8 दिवसापूर्वी कुऱ्हा गावातील तलाठी याची भेट घेतली असता यातील आलोसे क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांना तुम्हाला प्रत्येक वर्षाचे 220 रुपये या प्रमाणे 6000 रुपये शासकीय फी भरावी लागेल, जर तुम्हाला शासकीय फी भरायची नसेल तर मला 5000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते त्या बाबत यातील तक्रारदार यांनी दिनांक 01/01/2025 रोजी ला. प्र. वि. जळगांव घटकांकडे तक्रार दिली होती.
    सदर तक्रारीची दिनांक 01/01/2025 रोजी पडताळणी केली असता यातील आलोसे क्रमांक 1 व आरोपी क्रमांक 2 यांनी तक्रारदार यांचे 7/12 उताऱ्यावर त्याचे वडील, काका, आत्या व मयत काकाच्या मुलाचे नाव लावण्याचे मोबदल्यात 5000/-लाचेची मागणी केली होती.
    त्यानंतर आज दिनांक 08/01/2025 रोजी सदर लाच रक्कम आरोपी क्रमांक 2 यांचे सांगणे वरून आरोपी 3 यांनी 5000 रुपये लाच रक्कम स्वतः स्विकारताना त्यांना रांगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर मुक्ताईनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
  • हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
  • सापळा पर्यवेक्षक अधिकारी
    श्री योगेश ठाकूर
    पोलीस उपअधीक्षक
    लाप्रवि जळगांव
    मो.न.9702433131
  • सापळा अधिकारी -पोलीस निरीक्षक, नेत्रा जाधव
    *सापळा पथक – GPSI दिनेशसिंग पाटील, पोकॉ प्रदिप पोळ, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव दोन दुचाकींच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Next Post

तपोवनरोडवर युवतीचा विनयभंग…एकतर्फी प्रेमातून कृत्य

Next Post
rape

तपोवनरोडवर युवतीचा विनयभंग…एकतर्फी प्रेमातून कृत्य

ताज्या बातम्या

Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011