नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी बेलापूर येथील मंडळ अधिकारी मंडलिक यांचे करिता १० हजाराची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून खासगी इसमाविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय, मौजे गळनिंब, तालुका श्रीरामपूर येथे खरेदी खताची नोंद सातबाऱ्यावर न घेण्याकरता हरकत अर्ज दाखल केला आहे. सदर हरकत अर्जाची सुनावणी मंडलिक, मंडळ अधिकारी, श्रीरामपूर अतिरिक्त कार्यभार बेलापूर, ता.श्रीरामपूर यांच्याकडे चालू असून सदर हरकत अर्ज प्रकरणामध्ये केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मंडळाधिकारी कार्यालय, बेलापूर येथे खाजगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी केरु वडीतके यांनी मंडलिक, मंडळाधिकारी, बेलापूर यांचे करता दह हजार रुपये रक्कमेची लाच मागणी केले बाबतची तक्रार १८ सप्टेंबर रोजी ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी शहाजी केरू वडीतके, खाजगी मदतनीस मंडळ अधिकारी, बेलापूर याने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या हरकत अर्ज प्रकरणातील केस चा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मंडळ अधिकारी मंडलिक यांचे दहा हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आरोपी यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच मागणी अहवाल
युनिट –अहिल्यानगर.
तक्रारदार- पुरुष,वय-36 वर्षे
आरोपी शहाजी केरू वडीतके (खाजगी इसम), वय-38 वर्ष, धंदा-खाजगी मदतनीस, मंडळ अधिकारी बेलापूर, रा.मांडवे, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर
*लाचेची मागणी- 10,000/- रुपये.
*लाच स्विकारली* -*निरंक
*हस्तगत रक्कम-* निरंक
लाचेची मागणी* दि.18/09/2024
लाच स्वीकारली निरंक
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय, मौजे गळनिंब, तालुका श्रीरामपूर येथे खरेदी खताची नोंद सातबाऱ्यावर न घेण्याकरता हरकत अर्ज दाखल केला आहे. सदर हरकत अर्जाची सुनावणी मंडलिक, मंडळ अधिकारी, श्रीरामपूर अतिरिक्त कार्यभार बेलापूर, ता.श्रीरामपूर यांच्याकडे चालू असून सदर हरकत अर्ज प्रकरणामध्ये केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मंडळाधिकारी कार्यालय, बेलापूर येथे खाजगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी केरु वडीतके यांनी मंडलिक, मंडळाधिकारी, बेलापूर यांचे करता 10,000/- रुपये रक्कमेची लाच मागणी केले बाबतची तक्रार दि. 18/09/2024 रोजी ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि. 18/09/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी शहाजी केरू वडीतके, खाजगी मदतनीस मंडळ अधिकारी, बेलापूर याने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या हरकत अर्ज प्रकरणातील केस चा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मंडळ अधिकारी मंडलिक यांचे करिता 10,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आरोपी यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे
*सापळा व तपास अधिकारी – राजु आल्हाट,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. अहिल्यानगर
*पर्यवेक्षण अधिकारी – अजित त्रिपुटे,पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहिल्यानगर
*सापळा पथक- पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, पोलीस अंमलदार गजानन गायकवाड, पोलीस अंमलदार उमेश मोरे, चापोहेकॉ हारुण शेख